7 वर्षीय बालिकेवर अत्याचार करणाऱ्यास 7 वर्ष सक्तमजुरी

नांदेड(प्रतिनिधी)-एका सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या 38 वर्षीय गुन्हेगाराला येथील विशेष पोक्सो न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी सात वर्ष सक्त मजुरी आणि पाच हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. दंडाचे 5 हजार रुपये पिडीत बालिकेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
21 जून 2018 रोजी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा एक कामगार सकाळी 9 वाजता आपल्या कामावर गेला. तो रात्री 8 वाजता परत आला या दरम्यान त्याच्या घरात पत्नी, एक सात वर्षी मुले होती. त्यांच्या घरातील एक शेळी बाजूच्या घरात गेली म्हणून सात वर्षीय बालिका त्या शेळीला आणण्यासाठी गेली. कांही वेळातच ती रडत परत आली. या बाबत आईने विचारणा केल्यानंतर तीने त्या ठिकाणी घडलेला प्रकार सांगितला. नवरा आल्यानंतर या बाबतची तक्रार वजिराबाद पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानुसार गुन्हा क्रमांक 152/2018 भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2) (1) आणि पोक्सो कायद्याच्या कलम 3 आणि 4 नुसार गुन्हा दाखल झाला.या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नमिता देशमुख यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.पिडीत बालिकेने या बाबत दिलेल्या न्यायालयातील जबाबानुसार शेळी आणण्यासाठी गेले तेंव्हा अब्दुल वकील उर्फ बाबा अब्दुल खलील (38) याने तिच्यासोबत लैैंगिक अत्याचार केला होता. न्यायालयातील विशेष पोक्सो खटला क्रमांक 40/2018 मध्ये एकूण 7 साक्षीदारांनी आपले जबाब नोंदवले. उपलब्ध पुरावा आधारे न्यायाधीश रविंद्र पांडे यांनी बालिकेवर अैंगिक अत्याचार करणाऱ्या अब्दुल वकील उर्फ बाबा अब्दुल खलील यास 7 वर्ष सक्तमजुरी, 5 हजार रुपये रोख दंड, दंड न भरल्यास एक महिना सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. दंड भरल्यास ते पाच हजार रुपये पिडीत बालिकेला देण्यात यावेत असा हा आदेश न्यायालयाने दिला आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. सौ.एम.ए.बत्तुला (डांगे) यांनी बाजू मांडली.या खटल्यात वजिराबादचे पोलीस अंमलदार जितेंद्र तरटे आणि बालाजी लांबतुरे यांनी पैरवी अधिकाऱ्याची भूमिका वठवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *