नांदेड(प्रतिनिधी)- पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्यातील पोलीस विभागात काम करणाऱ्या वरिष्ठ श्रेणी लिपीकांना प्रमुख लिपीक या पदावर तात्पुर्ती पदोन्नती दिली आहे. 140 जणांना दिलेल्या पदोन्नती आदेशावर अपर पोलीस महासंचालक (प्रशासन) अनुपकुमारसिंह यांची स्वाक्षरी आहे.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या मान्यतेनंतर राज्यभरातील पोलीस विभागात काम करणाऱ्या 140 जणांना वरिष्ठ श्रेणी लिपीकांना प्रमुख लिपीक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्राशी संबंधीत 10 जण आहेत. पदोन्नतीसह या प्रमुख लिपीकांना नवीन जागी नियुक्ती देण्यात आली आहे.
140 पदोन्नती प्राप्त प्रमुख लिपीकांमध्ये नांदेड पोलीस परिक्षेत्राशी संबंधीत 10 जण पुढील प्रमाणे आहेत. त्यांची नवीन नियुक्ती कंसात लिहिलेली आहे. श्रीमंता नागोराव आठवले -नांदेड(हिंगोली), गणेश यादव माने-नांदेड(औरंगाबाद शहर), संभाजी बाबूराव पोलगणे-लातूर (लातूर), भास्कर विश्र्वनाथ हटकर-परभणी(परभणी), अशोक किशनराव वाघमारे आणि सुदेश किशनलाल परदेशी-पोलीस अधिक्षक लातूर कार्यालय (प्राचार्य पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर कार्यालय), नितीनकुमार देविदास मोरे-परभणी (हिंगोली), चंद्रकांत परमेश्र्वर कपाळे-नांदेड(हिंगोली), दिनकर भाऊराव चौधरी-वर्धा(हिंगोली), विजय डी.गरुडकर-लातूर(नांदेड).
पोलीस महासंचालक कार्यालयाने 140 वरिष्ठ लिपीकांना प्रमुख लिपीक पदोन्नती दिली