नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्हा अभिवक्ता संघटनेच्या अध्यक्ष पदी अँड. सतीश पुंड निवडून आले आहेत. प्रतिस्पर्धी अँड. मिलिंद एकताटे हे होते. या निवडणूकीत सह सचिव पदाचे उमेदवार अँड.रुशीकेश संतान फक्त एका मताच्या आघाडीने निवडून आले आहेत.
आज नांदेड अभिवक्ता संघाची द्विवार्शिक निवडणुक पार पडली. या निवणूकीसाठी दिनांक 30 सप्टेंबर रोजी मतदान झाले.त्यात 1252 मतदारांपैकी 1117 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.टक्केवारी नूसार 89 टक्के मतदान झाले.
आज दिनांक 1 आँक्टोबर रोजी मतमोजणी झाली.त्यात प्रमुख निवडणुक निर्णय अधिकारी अँड.मुकुंद चौधरी, सहायक निवडणुक निर्णय अधिकारी अँड.बी.जी.मोरे आणि अँड.एम.जी. बादलगांवकर यांच्यासह अँड.एन.जी.शिंदे,अँड. शेख सुलेमान, अँड.पी.एस.उपाशे,अँड.प्रविण लिंबुरकर, अँड.अब्बास खान, अँड. एल.जी. पुयड,अँड. भंवर व्यंकटेश,अँड.अभय सोळंखे,अँड.विलास देशमुख,अँड. केशव हनमंते,अँड. संभाजी हनमंते,अँड. निखील चोधरी,अँड.आर.आर.नरवाडे यांनी परिश्रम घेतले.
जिंकलेले उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.अध्यक्ष – अँड.सतीश पुंड, उपाध्यक्ष- अँड.विजय बारसे,सचिव-अँड. नितीन कागणे, सह सचिव- अँड रुषीकेश संतान,कोषाध्यक्ष-पांडूरंग अंबेकर,विशिष्ट सहायक – अँड अजीम सिध्दीकी या नव निर्वाचीत वकील संघाच्या सदस्यां मध्ये रुषीकेश संतान फक्त एका मताच्या आघाडीने निवडून आले आहेत. तसेच सचिव पदी नवनिर्वाचित अँड. नितीन कागणे हे दुसऱ्यांदा याच पदावर निवडून आले आहेत. नवनिर्वाचीत बारा सदस्यांची नावे समजली नाहीत.