नांदेड(प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक कार्यालयात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री या दोन महापुरूषांची जयंती साजरी करण्यात आली.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक विकास तोटावार, जनसंपर्क अधिकारी शिवाजी लष्करे, पोलीस अंमलदार उत्तम वाघमारे, सुर्यभान कागणे, विनोद भंडारी, जिल्हाची जबाबदारी सांभाळणारे नियंत्रण कक्षातील फौजदार नागोराव कुंडगिर यांच्यासह पोलीस अधिक्षक कार्यालयातील विविध शाखांचे अनेक अधिकारी आणि अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी दोन्ही महापुरूषांना अभिवादन केले.
पोलीस अधिक्षक कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री जयंती साजरी