नांदेड(प्रतिनिधी)-11 ऑगस्ट रोजी 7 लाख 70 हजार रुपयांच्या लुट प्रकरणातील एका आरोपीला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी.जी.फुलझळके यांनी 3 तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.11 ऑगस्ट रोजी गोकुळनगर भागातील बालाजी ट्रेडर्स या सिमेंट दुकानातील नोकर मंडळी त्या दिवशीचे रोख क्लेक्शन 7 लाख 70 हजार रुपये लुटल्याचा प्रकार घडला. दुकान मालक हनुमानप्रसाद अग्रवाल यांनी दिलेल्या तक्रारीनंतर दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील दुकानातील एका नोकरासह चार जणांना पोलीसांनी पकडले होते. त्यांच्याकडून लाखो रुपये जप्त सुध्दा करण्यात आले होते. पण या प्रकरणातील मुख्य आरोपी मारोती हरी सरोदे हा फरार झाला होता. या फरार आरोपीला पकडण्यात शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाने जबर कामगिरी करत मारोती हरी सरोदेला पुणे येथून पकडून आणले.
आज सहाय्यक पोलीस निरिक्षक रवि वाहुळे, पोलीस अंमलदार रवि बामणे, शिलराज ढवळे, विशाल अटकोरे आदींनी मारोती हरी सरोदेला न्यायालयात हजर करून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. न्यायाधीश सी.जी. फुलझळके यांनी मारोती सरोदेला तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.
7 लाख 70 हजारांच्या लुट प्रकरणात मुख्य आरोपी पोलीस कोठडीत