नांदेड(प्रतिनिधी)-अत्यंत छोट्या कुटूंबातून पोलीस निरिक्षक या पदापर्यंत पोहचलेल्या माजी पोलीस निरिक्षक शिवाजीराव सोनवणे यांचे उस्मानाबाद येथे निधन झाले.
मुळ उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवाजीराव सोनवणे हे सुरूवातीला उस्मानाबाद जिल्ह्यात पोलीस म्हणून आपल्या जीवनाची सुरूवात करणारे एक मनमिळावू व्यक्तीमत्व होते. पुढे त्यांनी विभागीय परिक्षेच्या माध्यमाने पोलीस उपनिरिक्षक पद प्राप्त केले. त्यानंतर पदोन्नती घेत त्यांनी पोलीस निरिक्षक पद प्राप्त केले. त्यांनी मुंबई, नांदेड, परभणी येथे काम केले. नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात त्यांनी आपली सेवा बजावली. त्यानंतर त्यांना परभणी जिल्हयातील पालम येथे पोलीस निरिक्षक पदावर काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील शहर पोलीस ठाण्यात त्यांनी पोलीस निरिक्षक या पदावर आपले कर्तव्य निभावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते. अत्यंत मनमिळावू आणि आपल्या कर्तव्याप्रती दक्ष अधिकारी अशी त्यांची ओळख होती. दि.1 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद येथे शिवाजीराव सोनवणे (65) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, एक मुलगा, नातू असा मोठा परिवार आहे. नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस अंमलदार अंजली सोनवणे यांचे शिवाजीराव सोनवणे वडील होते.
माजी पोलीस निरिक्षक शिवाजीराव सोनवणे यांचे निधन