नांदेड(प्रतिनिधी)-रेल्वे नोकरी लावतो म्हणून एका व्यक्तीकडून 3 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या शेख जाकीर विरुध्द उस्माननगर पोलीसंानी गुन्हा दाखल केला आहे.
युनुस हसनसाब कुरेशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या मुलास रेल्वे खात्यात नोकरी लावून देतो म्हणून उस्माननगर येथील शेख जाकीर शेख अफजल या भामट्याने त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये उखळले आहेत. हा सर्व प्रकार जून 2018 ते आजपर्यंत घडलेला आहे. युनुस कुरेशी यांच्या तक्रारीवरुन उस्माननगर पोलीसंानी गुन्हा क्रमांक 195/2021 कलम भारतीय दंड संहितेच्या 420 प्रमाणे दालख केला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक ज्ञानेश्र्वर देवकते यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक बी.पी.थोरे यांच्याकडे देण्यात आला आहे.
शेख जाकीर विरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल