नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या बालिकेसोबत विहिरीत उडी घेवून आत्महत्या करणाऱ्या महिलेविरुध्द अबेटेड समरी असा खूनाचा गुन्हा नायगाव पोलीसांनी दाखल केला आहे. मागितल महिन्यात होटल रस्त्यावर सुध्दा असा प्रकार घडला होता तो गुन्हा देगलूर पोलीसांनी दाखल केला होता.
दि.3 सप्टेंबर रोजी आपल्या शेजारच्या वयोवृध्द महिलेने माझ्या घरासमोर कचरा का टाकला या कारणावरून निलुबाई अंकुश गोईनवाड (25) रा.गडगा ता.नायगाव यांना रागवले. या रागातून निलुबाईने वृध्द महिलेला मारहाण केली आणि कोणास कांही न सांगता आपली दीड वर्षाची मुलगी अक्षरा तिला सोबत घेवून घरातून निघून गेली. 9 सप्टेंबर रोजी गडगा शिवारातील सुलोचनाबाई आलमपुरे यांच्या शेतातील विहिरीत निलुबाईचा मृतदेह सापडला. निलुबाईच्या पोटाला दीड वर्षाची बालिका अक्षराचा मृतदेह सुध सापडला .त्यावेळी आकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला होता. त्याची चौकशी पोलीस उपनिरिक्षक शिवकुमार बाचावार यांनी केली. चौकशीतील तथ्यानुसार शिवकुमार बाचावार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन निलुबाईने अक्षराचा खून करून स्वत: आत्महत्या केली आहे. आता मयत निलुबाई विरुध्द अक्षराचा खून केला असा गुन्हा नायगाव पोलीसांनी दाखल केला आहे. हा गुन्हा क्रमांक 188/2021 कलम 302 भारतीय दंड संहितेप्रमाणे आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक शिंदे यांच्याकडे देण्यात आला.
दि.11 सप्टेंबर 2021 रोजी सुध्दा होटल रस्त्यावर एका विहिरीत नागुबाई बालाजी पवार या महिलेने आपली चार वर्र्षीय मुलगी शिवानीला सोबत घेवून विहिरीत उड्डी मारली होती. याबाबत देगलूर पोलीसंानी शिवानीला मारणारी त्यांची आई नागुबाई पवार यांच्याविरुध्द असा अबेटेड समरी अहवालाचा खूनाचा गुन्हा दाखल केला होता असे एका महिन्यात दोन प्रकार घडले आहेत.
आपल्या बालिकेसह विहिरीत उडी मारणाऱ्या आई विरुध्द दुसरा अबेटेड समरी खूनाचा गुन्हा दाखल