नांदेड,(प्रतिनिधी) – आज गुरुवारी ९१५ तपासणीत दोन नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडले आहेत. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या १५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.
प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज दोन नवीन रुग्ण सापडले आहेत.
मनपा गृह विलगीकरण-०१,लोहा-०१,रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७६६५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आज ९१५ अहवालांमध्ये ९१० निगेटिव्ह आणि ०२ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०३३२ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०१ आणि अँटीजेन तपासणीत ०१ असे एकूण ०२ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत. आज सापडलेले नवीन मनपा-०१,आणि हदगाव-०१ असे आहेत.
आज कोरोनाचे १५ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१० , नांदेड जिल्ह्यातील तालुकाअंतर्गत गृह विलगिकरण -०१, सरकारी रुग्णालय
विष्णुपुरी-०४ ,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०१ रुग्ण आहेत.
गुरुवारी सापडले दोन नवीन कोरोना बाधीत रुग्ण;तपासणी ९१५