नांदेड (प्रतिनिधी)- जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळा सुगाव बु. या शाळेत जि.प.ने जाहीर केलेल्या “नऊ दुर्गांचा नऊ दिवस सन्मान’ या उपक्रमा अंर्तगत आज पहिली माळ गुंफण्यात आली.त्यानिमित्य इयता मुलींचा पुष्पहार घालुन सन्मान करण्यात आला.
सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन बोलतांना ताकबीडे म्हणाले की ज्या कुंटुंबात महिलांचा, मुलींचा सन्मान केला जातो ते कुंटुंब प्रगतीच्या दिशेने पाऊल टाकते. त्यामुळे या नवरात्र महोत्सवात महिला भगिनींचा सन्मान झाला पाहिजे . त्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे. खऱ्या अर्थाने महिला हिच कुंटुंबाचा , राष्टाचा आधार आहे. त्यामुळे बालपणा पासुनच शाळेत असा सन्मान झाला तर मुली गौरवशाली बनतील. असे उदगार काढले. इयता पहिलीतील पुढील अनुक्रमे कु.पायल वाढवे , अपर्णा वैद्य , गौरी हिंगमिरे , सिद्धी हिंगमीरे , प्रणीता फुलारी , संस्कृती वैद्य , राशी वाढवे , जोया शेख या आठ विद्यार्थीनींचा पुष्पहार घालुन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आर.बी.जल्लावार यांनी मनोगत व्यक्त केले. छोटेखानी कार्यक्रमाचे प्रास्तावीक सौ.अरुणा कोटगीरे यांनी तर सुत्रसंचलन सौ.मेघाराणी देशमुख यांनी केले. आभार सौ. स्वाती गीरी यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ.भाग्यश्री चव्हाण व सौ. ज्योती हाणेगावे यांनी प्रयत्न केले.