नांदेड(प्रतिनिधी)-शहरातील खोब्रागडेनगर भागात एक जबरी चोरी झाली आहे. बेरळी खु. तालुका लोहा येथे एका घरातून चोरी झाली आहे. किनवट येथून बीएसएनएलचे वायर चोरीला गेले आहेत आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी चोरीला गेली आहे.
अनिल निवृत्ती जाधव यांची खोब्रागडे नगर भागात किराणा दुकान आहे. तेथे दि.6 ऑक्टोबरच्या रात्री 9 वाजता एक जण आला सिगरेट आणि तोटा दे असे त्या माणसाने सांगितले. पण फ्रिमध्ये देणार नाही असे सांगितल्यावर त्या माणसाने चॉकलेट आणि बिस्कीटच्या भरण्या त्या माणसाने रस्त्यावर फेकून दिल्या. त्यामुळे 500 रुपयांचे नुकसान झाले. त्या दुकानदाराला मारहाण करून लुटणारूने त्यांच्या कॅश बॉक्समधील 1 हजार रुपये बळजबरीने चोरून नेले आहेत.
भुजंग सुंदर नारसुने रा.बरळी खु.ता.लोहा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 ऑक्टोबरला दुपारी 12.30 ते 1.30 यावेळे दरम्यान ते आणि त्यांची पत्नी शेतात काम करण्यासाठी गेले होते. सोबतच त्यांच्या घरातील सुनबाई कपडे धुण्यासाठी जवळच्या नाल्यावर गेली होती. त्यामुळे घरात त्यांची आई एकटी होती. आई समोरच्या खोलीत झोपल्या असतांना कोणी तरी चोरट्याने घरात येवून घरातील बेडरुममधील छज्जावर ठेवलेली सुटकेस काढून त्यातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 24 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. लोहा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शेख करीत आहेत.
रविकुमार हिरालाल महेंद्रकर हे दुरसंचार विभागात कनिष्ठ अभियंता आहेत. त्यांची नियुक्ती किनवट येथे आहे. 30 सप्टेंबर रोजी सकाळी 5 वाजता बीएसएनएल कार्यालयातील केबल किंमत 44 हजार 864 रुपयांचे कोणी तरी चोरून नेले आहेत. किनवट पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक जाधव अधिक तपास करीत आहेत.
शेख नबी पाशा शेख पाशा मियॉ यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.वाय.1156 ही 25 हजार रुपये किंमतीची गाडी 4-5 ऑक्टोबरच्या रात्री धनेगाव येथून चोरीला गेली आहे. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. या बाबत तपास सुरु आहे.
एक जबरी चोरी, घरातून चोरी, बीएसएनएलचे वायर चोरी आणि दुचाकी चोरी