उमरी प्राथमिक आरोग्य रुग्णालयात डॉ.शंकर चव्हाणला मारहाण 

नांदेड(प्रतिनिधी)-उमरी येथील वैद्यकीय अधिक्षकास एका रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना 13 ऑक्टोबर रोजी घडली आहे. 
                       13 ऑक्टोबर रोजी सकाळी ग्रामीण रुग्णालय उमरी येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.शंकर चव्हाण हे आपले दररोजचे काम करीत असतांना दुर्गानगर ता.उमरी येथील एक महिला रुग्ण उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय उमरी येथे दाखल झाल्या. तेंव्हा डॉ.शंकर चव्हाण यांनी त्या महिलेवर प्राथमिक उपचार केले. सोबतच पुढील उपचारासाठी नांदेडला जाण्यासाठी पत्र दिले आणि रुग्णाच्या नातेवाईकांना रुग्णवाहिका बोलवण्याची सूचना दिली. 
                         या प्रकारात कोठे काय घडले हे समजलेच नाही आणि रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी डॉ.शंकर चव्हाण यांच्या जवळ येवून त्यांना मारहाण केली. घटना पाहताच ग्रामीण रुग्णालयातील इतर डॉक्टर व कर्मचारी यांनी तिकडे धाव घेतली तेंव्हा डॉ.शंकर चव्हाणला मारहाण करणारे पळून गेले. घडलेला प्रकार दुर्देवी आहे. यासाठी उमरी दवाखान्यातील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला. पोलीस ठाणे उमरी येथील पोलीस निरिक्षक मोहन भोसले यांनी सांगितले की, उमरी ग्रामीण रुग्णालयात घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती घेवून, मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करणार आहोत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *