नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाचे सदस्य मनप्रितसिंघ कुंजीवाले यांच्यासह दोन जणांना नांदेड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी एका मारहाण प्रकरणात अटकपुर्व जामीन नाकारला आहे.
दि.1 ऑक्टोबर रोजी अमरसिंघ रतनसिंघ नांदेडवाले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजेच्यासुमारास गोदावरी नदीला आलेला पुर पाहण्यासाठी गेले असतांना मनप्रितसिंघ गोविंदसिंघ कुंजीवाले आणि अमनदिपसिंघ उर्फ अमितसिंघ योगींगदरसिंघ बुंगई या दोघांनी त्यांच्याजवळ येवून जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि मी माता साहिब जमीन खरेदी विक्री बाबत विचारणा केली असतांना शिवीगाळ करून खंजरने मारहाण केली. त्यामुळे माझ्या डाव्या हाताची करंगळी व त्या बाजूच्या बोटाला जखम झाली. कमरेच्या डाव्या बाजूला सुध्दा त्यांनी खंजीरने जखम केली. या संदर्भाने वजिराबाद पेालीसांनी गुन्हा क्रमांक 349/2021 कलम 326, 323, 504, 506, 34 भारतीय दंड संहिता आणि भारतीय हत्यार कायद्या कलम 4/25 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक रमेश खाडे यांच्याकडे देण्यात आला.
या प्रकरणी गुरूद्वारा बोर्डाचे सदस्य मनप्रितसिंघ गोविंदसिंघ कुंजीवाले आणि त्यांचे सहकारी अमनदिपसिंघ उर्फ अमितसिंघ योगेंद्रसिंघ बुंगई यांनी नांदेडच्या जिल्हा न्यायालयात अटकपुर्व जामीन मिळावा म्हणून दि.8 ऑक्टोबर रोजी याचिका क्रमांक 805/2021 दाखल केली. या अर्जावर आपला से देतांना पोलीसांनी सविस्तर लिहुन या दोघांना जामीन नाकारावा अशी विनंती केली. या प्रकरणात सरकारी पक्षाच्यावतीने ऍड. यादव तळेगावकर यांनी युक्तीवाद केला. 12 ऑक्टोबर 2021 रोजी या फौजदारी जामीन अर्ज क्रमांक 805 चा निकाल आला त्यात न्या.के.एन.गौतम यांनी या प्रकरणातील दोघांनी मागितलेला अटपुर्व जामीन रद्द केला आहे.
मारहाण प्रकरणात गुरूद्वारा बोर्ड सदस्यांसह दोन जणांचा अटकपुर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला