नांदेड(प्रतिनिधी)-एका 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू डॉक्टर्सलेनमधील साई पॅलेस हॉटेलमध्ये आज 14 ऑक्टोबर रोजी सकाळी मरण पावलेल्या अवस्थेत सापडला आहे.
साई पॅलेस हॉटेलचे मॅनेजर जयदीप संतोष अंभोरे यांनी दिलेल्या खबरीनुसार आज 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 5.15 मिनिटाला त्यांच्या हॉटेलमध्ये थांबलेला सुनिल हरीभाऊ वानरे हा एका महिलेसोबत थांबलेला होता. तो सकाळी कांहीच हालचाल करतांना दिसला नाही. तेंव्हा त्यांनी पोलीसांना बोलवले. पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार, पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील व इतर पोलीस अंमलदारांनी जावून पाहणी केली असता हडको येथील वैभवनगर परिसरातील सुनिल हरीभाऊ वानरे (38) हा व्यक्ती मरण पावलेला होता. वजिराबाद पोलीसांनी या संदर्भाने आकस्मात मृत्यू क्रमांक 5/2021 दाखल केला आहे.
हॉटेलमध्ये थांबलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू