नांदेड(प्रतिनिधी)- दि.15 ऑक्टोबर रोजी होणारा दसरा महोत्सव आणि दि.16 ऑक्टोबर रोजी होणारे दुर्गा विसर्जन या दोन दिवसांसाठी शहरातील वाहतुकीला अनेक पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत. ही अधिसुचना पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यावतीने जारी करण्यात आली आहे.
दि.15 ऑक्टोबर रोजी शहरात साजरा होणार दसरा महोत्सव, हल्ला-महल्ला मिरवणूक आणि 16 ऑक्टोबर रोजी शहराच्या विविध भागातून होणारे दुर्गामुर्तीचे विसर्जन या सणांसाठी मुख्य रस्त्यावर एका दिवसासाठी वाहतुकीच्या अनेक मार्गांमध्ये बदल करण्यात आला आहे. कांही मार्गांना वळण देवून पर्यायी मार्ग तयार करण्यात आले आहेत.
वाहतुकीकरीता बंद असलेले मार्ग- जुना मोंढा, देना बॅंक, महाविर चौक, तरोडेकर मार्केट, वजिराबाद चौक, कलामंदिर, शिवाजीनगर ते आयटीआय चौक हा मार्ग जाण्या आणि येण्यासाठी बंद राहिल. राजकॉर्नर-आयटीआय या मार्गावर येण्यासाठी राजकॉर्नर, वर्कशॉप टी पॉईंट, श्रीनगर ते आयटीआय या रस्त्यावरील डावीबाजून बंद राहिल. राजकॉर्नर ते दरोडा नाकाकडे जाण्यासाठी डावी बाजू बंद राहिल. यात्रीनिवास ते जुना मोंढा बर्की चौक हा एक मार्गी रस्ता असल्याने येण्या-जाण्यासाठी पुर्णपणे बंद राहिल. सिडको, हडको ते लातूरफाटा भागातून नांदेड शहराकडे नावघाटच्या संत दासगणु पुलाकडून इतवारा भागात येणारी वाहतूक आणि नवीन पुलावरून जुन्या मोंढा भागात येणारी वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात येईल.
वाहतुकीकरीता पर्यायी मार्ग-वजिराबाद चौक ते श्रीनगर, वर्कशॉपकडे जाणारी वाहतुक, वजिराबाद चौक, तिरंगा चौक, पोलीस मुख्यालय, लालवाडी अंडर ब्रिज, शिवाजीनगर पिवळीगिरणी, गणेशनगर वायपॉईंटकडे जाण्या-येण्यासाठी वापर करता येईल. राजकॉर्नर ते जुना मोंढा मार्गावरील वाहतूक राजकॉर्नर, वर्कशॉप कॉर्नर, भाग्यनगर, आनंदनगर, नागार्जुना टी पॉईंट, अण्णाभाऊ साठे चौक , हिंगोलीगेट उड्डाणपुलावरून यात्रीनिवास पोलीस चौकी त ेपुढे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल. गोवर्धनघाट पुलावरून आलेली वाहतुक पोलीस मुख्यालयासमोरून गणेशनगर वायपॉईंटपर्यंत जाऊ शकेल.
यात्रीनिवास ते जुना मोंढा बर्की चौक मार्गावरील वाहतुक मोहम्मदअली रोड, किंवा धान्य मार्केट, वाटमारी रोड, बर्की चौक ते लोहारगल्ली रोड, भगतसिंघ चौक, अबचलनगर, यात्रीनिवास चौकी, बाफना टी पॉईंट व पुढे येण्या-जाण्यासाठी सुरू राहिल. लातूरफाटा, सिडको, हडको, रमाई आंबेडकर चौक (ढवळे कॉर्नर), चंदासिंग कॉर्नर, धनेगाव चौक, वाजेगाव, देगलूरनाका, रजाचौक, बाफना मार्गे, माळटेकडी मार्गे जाण्या-येण्यासाठी वापरता येईल.
हा वाहतुक बदलातील आदेश महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 36 नुसार अधिसुचना म्हणून जाहिर झाला आहे. हा आदेश 15 ऑक्टोबरच्या सकाळी 11 वाजल्यापासून 16 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत अंमलात राहिल.
15 व 16 ऑक्टोबर रोजी पर्यायी वाहतुकींचे मार्ग वापरा-प्रमोदकुमार शेवाळे