नांदेड(प्रतिनिधी)-नांदेडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर आणि समन्वयक अधिकारी डॉ.हणंमत पाटील यांच्या मार्गदर्शनात एका पथकाने 13 ऑक्टोबर रोजी भोकर शहरात 24 तंबाखू विक्रेत्यांकडून 31 हजार 50 रुपये दंड वसुल केला. अचानक धाड पडल्याची खबर जशी फिरली त्यानुसार अनेक पानपट्टी चालकांनी दुकाने बंद करून पळू काढला होता.
शासन निर्णयानुसार कोणत्याही प्रकारचे तंबाखू व तंबाखू जन्य पदार्थ, धुम्रपान सार्वजनिक ठिकाणी करता येत नाहीत आणि त्यांची विक्री सुध्दा करता येत नाही. अशा परिस्थितीत या शासन निर्णयाची अंमलबजावणी पाहुन नांदेडचे अत्यंत कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर , डॉ.हणमंत पाटील यांच्या सल्ल्यानुसार डॉ.साईप्रसाद शिंदे, प्रकाश आहेर, ग्रामीण रुग्णालय भोकर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.अशोक मुंडे, डॉ.राजाराम कोळेकर, पोलीस निरिक्षक विकास पाटील आणि शेख यांच्या पथकाने भोकर शहरात जवळपास 24 तंबाखू विक्रेत्यांकडून 31 हजार 50 रुपये दंड वसुल केला. अचानक तपासणीची माहिती पसरली तेंव्हा अनेक पानपट्टी चालकांनी पळ काढला.
सार्वजनिक ठिकाणी, शैक्षणिक संस्था, शासकीय कार्यालय परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री, सेवन आणि साठवण होत असल्याची माहिती जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष यांना कळवावी. हे कार्यालय जिल्हा रुग्णालय येथे कार्यान्वीत आहे. जनतेने कोरोना संक्रमणास प्रतिबंधक करण्यासाठी सहकार्य करावे आणि याबद्दलची माहिती द्यावी असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
तंबाखू नियंत्रण पथकाने भोकरमध्ये 24 तंबाखू विक्रेत्यांकडून 31 हजार दंड वसुल केला