गेले ते कावळे, राहिले ते मावळे ; भाजपचे प्रांत सदस्य चैतन्य बापू देशमुख यांचा खतगांवकरांना टोला

नांदेड (प्रतिनिधी)-  निष्ठावंतांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत पक्षाचा राजीनामा देणाऱ्या माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांना पक्षात एंट्री केल्यानंतर लगेच डायरेक्ट प्रदेश उपाध्यक्ष पद देण्यात आले त्यावेळी निष्ठावंतांवर अन्याय झाल्याची उपरती झाली नाही आताच कशी झाली असा प्रश्न उपस्थित करत   गेले ते कावळे, राहिले ते मावळे असा टोला भाजपचे प्रांत सदस्य चैतन्य बापू देशमुख यांनी स्वार्था साठी पक्ष सोडणाऱ्या माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांना लगावला आहे.
  पक्षात निष्ठावंतांवर अन्यायाची मालिकाच सुरु झाली. ही बाब अनेकदा राज्याच्या नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही दुर्दैवाने त्याकडे  दुर्लक्ष करण्यात आले असल्याचा आरोप करत माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याची माहिती रविवारी पत्रकार परिषदेत दिली. पक्ष  नेतृत्वावर केलेल्या आरोपांचा  चैतन्य बापू देशमुख यांनी समाचार घेतला आहे. भारतीय जनता पक्षाने पक्षाची ध्येय ,धोरणे व विचारसरणी ज्यांनी स्विकारली त्याला पक्षात प्रवेश दिला आहे. तसेच  पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय शिरसावंध मानणारे पक्षात कार्यकर्ते आहेत ..स्व :हिताला तिलांजली देत पक्ष वाढावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांची फोज पक्षात आहे.. असे स्पष्ट करत , देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातून  तीन वेळा, लोकसभेतही तीन वेळा प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्यानंतर जिल्ह्याचा विकास सोडा देगलूर-बिलोली तालुक्यात किती विकास केला ,गोदावरी मनार कारखाना बंद का पडला याचे उत्तर द्यावे .नायगाव विधान सभेसाठी परिवारातील सदस्याचा विचार न झाल्याने पक्षाच्या विरोधात काम करणे हीच आपली निष्ठा का असा सवाल करत ,.पक्षावर निष्ठा व पक्ष नेतृत्वावर विश्वास असणाऱ्यांचीच पक्षाला गरज आहे असे  स्पष्ट करत  आयाराम ,उपऱ्याना किती महत्व दयावे ठरवण्याची वेळ आली  असल्याचे   चैतन्य बापू देशमुख म्हणाले आहेत.
 देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघातील जनता गेल्या अनेक वर्षा पासून विकासाच्या  प्रतीक्षेत आहे .पोटनिवडणुकीच्या माध्यमातून त्यांना संधी चालून आली आहे .यामुळे भाजपाच्या उमेदवारास विजयी करून विकासाचा श्री गणेशा येथील जनता निश्चित करेल असा विश्वास  चैतन्य बापू देशमुख यांनी व्यक्त केला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *