नांदेड (प्रतिनिधी)- दुर्गा विसर्जनाच्या शास्त्री इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाठक गल्लीमध्ये मारहाणीचा प्रकार घडला आहे. मारहाण झालेले तीन व्यक्ती शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहेत. वृत्त लिहीपर्यंत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली नव्हती.
16 ऑक्टोबर रोजी शहरात अनेक मंडळांनी दुर्गा विसर्जन केले. इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा दुर्गा विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. दरम्यान रात्री 11 वाजता पाठक गल्लीमध्ये भांडण झाले. या भांडणात चेतन मामीडवार यांच्या डोक्याला मार लागला आहे, सचिन पंढरीनाथ कुलथे यांच्या हाताला मार लागला आहे आणि पंढरीनाथ कुलथे यांच्या कपाळावर मार लागला आहे. हे तिनही लोक सध्या शासकीय रूग्णालयात उपचार घेत आहेत.
याबद्दल सचिन कुलथे यांनी दुरध्वीवरून सांगितले की, माझ्या घरावर 30 ते 35 जणांच्या लोकांच्या जमावाने हल्ला केला आणि तलवारीने मला, माझे वडील आणि माझ्या काकांना मारहाण केली आहे. पाठक गल्ली परिसरात या घटनेचा मागोवा घेतला असता वेगवेगळ्या चर्चा आहेत, पण वृत्त लिहीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्याची नोंद या घटनेसंदर्भाने झालेली नव्हती. गुन्हा दाखल झाल्यावर यातील सत्यता समोर येईल. सचिन कुलथे हे बजरंग दलाचे कार्यकर्ते आहेत.
दुर्गा विसर्जनाच्या रात्री जुन्या नांदेड भागातील पाठक गल्लीमध्ये घडली मारहाण