नांदेड (प्रतिनिधी)- वसंतनगर भागात एक 50 वर्षीय महिला देवदर्शन करून घरी परत जात असताना तिच्या गळ्यातील मंगळसुत्राची पोत काही चोरट्यांनी तोउून नेल्याचा प्रकार घडला आहे.
सौ. कमल शिवराज केंद्रे (50) या महिला मुक्तेश्वर आश्रम वसंतनगर येथून दर्शन घेऊन 15 ऑक्टोबर रोजी रात्री9.30 वाजेच्या सुमारास घरी परत जात असताना जिल्हा परिषदेच्या शाळेशेजारी त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे 40 मणी आणि 13 ग्रॅमचे दुसरे गंठन असे 2 तोळे 8 ग्रॅम वजनाचे सोन्याचे साहित्य जबरदस्तीने हिसकावून नेले आहे. या ऐवजाची किंमत 1 लाख रूपये आहे. शिवाजीनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.
महिलेचा 1 लाख रूपयांचे सोन्याचे गंठन तोडले