नांदेड (प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण पोलिसांनी 29 लाख 46 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने परत केले पण 7 ऑक्टोबर रोजी चोरी झालेल्या गुन्ह्याची तक्रार तपासासाठी देण्यात आली आहे. याला काय म्हणावे. कायद्याच्या शब्दांचा आधार घेत हा अर्ज लिहिलेला आहे. या अर्जावरील हस्ताक्षर सुद्धा कोणीतरी पोलिसानेच लिहिलेला आहे, अशी शंका येते.
दिपक सुधाकर डोईबळे हे फोटोग्राफर आहेत. सिडको येथे दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 2 ते 3 वाजेच्या सुमारास कोणीतरी चोरट्यांनी त्यांचे दुकान फोडून त्यातून कॅमेरा, लेन्स असा 80 हजारांचा ऐवज चोरून नेला होता. 7 ऑक्टोबर रोजी दीपक डोईबळे यांनी या बाबतची तक्रार पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे दिली असताना त्यावर पृष्ठांकन करण्यात आले की, डी.बी. पोना/741 मलदोडे साहेब यांच्याकडे दिला. याचा अर्थ हा अर्ज तपास करण्यासाठी त्यांच्याकडे दिला.
या अर्जावर लिहिलेली अक्षरे बारकाईने पाहिले असता हा अर्ज कोणीतरी पोलिसानेच लिहिला असल्याची शंका येते. सही मात्र दिपक डोईबळे यांची आहे. या अर्जात विषय अनिल फोटो स्टुडिओ दुकानाचे शटर तोडून कॅमेरा व इतर साहित्या चोरी झाल्याप्रकरणी असे लिहिलेले आहे. पण या अर्जात सर्वात शेवटी साहेबांनी अर्जाचा जाणिवपुर्वक विचार करून माझे साहित्य लवकरात लवकर मिळवून द्यावे ही विनंती असे शब्द लिहिलेले आहे आणि या शेवटच्या शब्दांमुळेच हा गुन्हा दाखल न करता फक्त अर्ज घेण्यात आला आहे, असे दिसते. कायद्यातील शब्दांचा वापर करून गुन्हा बर्क करण्याचा हा प्रकार आहे, असे एका सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
एकीकडे जप्त झालेले सोने फिर्यादींना देऊन ज्यावर त्याच्याच हक्क असतो, तरी पण फोटो काढले. पण एका गरीब फोटोग्राफरचा चोरीचा गुन्हा अद्याप दहा दिवसांपर्यंत दाखल झालेला नाही.
माझे साहित्य लवकरात लवकर मिळवून द्यावे असे शब्द लिहून गुन्हा बर्क करण्याची नांदेड ग्रामीण पोलिसांची नवीन पद्धत