नांदेड (प्रतिनिधी)- मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात मुलाच्या आईच्या खात्यातील 63 हजार 642 रूपये गायब करून फसवणुक झाली आहे.
किनवट येथील दिपाली विनोद पत्तेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजेच्यासुमारास त्यांचा मुलगा मोबाईल गेम खेळत असताना कोणीतरी अज्ञात माणसाने एसबीआय शाखा किनवट येथून 63 हजार 642 रूपये वळती केले आहेत. किनवट पोलिसांनी हा गुन्हा भारतीय संहितेचे कलम 420 आणि भारतीय तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 (ड) नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक थोरात करीत आहेत.
मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात आईच्या खात्यातून रक्कम लंपास