नांदेड(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयाने एका नोटरी वकीलाने माझ्यासमक्ष अशी स्वाक्षरी कागदपत्रांना करतांना ती व्यक्ती हजरच नव्हती त्यामुळे नोटरी वकीलाला न्यायालयाचा अवमान या सदराखाली नोटीस पाठविण्यात आली आहे. याचे उत्तर 21 ऑक्टोबर रोजी द्यायचे आहे. सोबतच एका महिलेची स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीविरुध्द उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती एस.जे. कठावाला आणि न्यायमुर्ती मिलिंद जाधव यांनी कार्यवाही करण्याची सुचना केली आहे. नोटरी वकीलांनी न्यायालयासमक्ष घोटाळा करण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात आपला आदेश निर्गमित केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयातील दिवाणी विभागातील रिट याचिका क्रमांक 4947/2021 समिना आरिफ खान उर्फ धनलक्ष्मी चंद्रकांत देवरुखकर यांनी दाखल केली. यामध्ये नगररचना विभाग आणि भुसंपादन विभाग यांना प्रतिवादी करण्यात आले होते. न्यायालयासमक्ष आलेल्या घटनाक्रमानुसार नोटरी काम करणारे ऍड. एस.एम.नकवी यांनी समिना आरिफ खानचे एक कागदपत्र साक्षांकीत केले होते. त्यावर 11/02/2020 अशी तारीख टाकून बीफोरमीचा रबरी शिक्का अंकीत करून त्यावर स्वाक्षरी केली होती. पण नोटरी अभिलेखाप्रमाणे रजिस्टरवरची स्वाक्षरी संदीप धरणे यांची आहे. न्यायालयाने विचारल्यानंतर मी गुडफेथमध्ये असे केल्याचे सांगितले. याबाबत न्यायालयासमक्ष उपस्थित असलेल्या संदीप धरणेला नोटरी ऍड. नकवी यांना किती पैसे दिले त्यावर त्याने सांगितले की, 1000 ते 1500 रुपये दिले.
आपला या संदर्भाचा निकाल देतांना न्यायालयाने ऍड. नकवी यांचे हे काम व्यवसायाविरुध्द आहे आणि नोटरी कायद्याविरुध्द आहे असे लिहिले. याबाबत नोटरी कायदा आणि भारतीय संविधानातील कलम 215 नुसार त्यावर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. संदीप धरणेने सुध्दा घोटाळा करत समिना ए खानची स्वाक्षरी केली. ही घटना अत्यंत गंभीर मानत न्यायमुर्तींनी संदीप धरणे विरुध्द सुध्दा कार्यवाही करण्याच्या सुचना केल्या आहेत. या संदर्भाने पुढील सुनावणीची तारीख 21 ऑक्टोबर 2021 सुनिश्चित करण्यात आलेली आहे.
ऍडव्होकेट नोटरी आणि एका खाजगी माणसाविरुध्द उच्च न्यायालयाचे कार्यवाहीचे आदेश