कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत करावे- न्यायाधीश एम.डी .बिरहारी

अर्धापूर,(प्रतिनिधी) विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी कायद्याचे सर्वांनी ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. बालहक्क कायदा, बाल कामगार कायदा, लैगिंक अत्याचार कायदा यासह अनेक कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी अवगत करणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन अर्धापूर तालुका न्यायाधीश एम.डी. बिरहारी यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमीत्त तालुका विधी समितीच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म.) येथील राजाबाई विद्यालयात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते

दिवाणी न्यायाधीश तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एम. डी. बिरहारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, शालेय जीवनातच कायद्याचे ज्ञान विद्यार्थ्यांनी प्राप्त करावे, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

पोलीस निरीक्षक अशोक जाधव यावेळी बोलताना म्हणाले की, सर्वजण पोलिसांना घाबरतात, मात्र पोलीस हे सर्वांचे मित्र आहेत. पोलीसा सोबत मित्रा प्रमाणे रहा जेणेकरून आपल्या मनातील पोलिसांची भीती दूर होईल.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश एम .डी .बिरहारी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विस्तार अधिकारी पंचायत समिती एस.पी. गोपले, शिक्षण विस्तार अधिकारी गंगाधरराव राठोड, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, लोकमान्य एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सदाशिवराव देशमुख, प्राचार्य शरदराव देशमुख आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांचा ग्रामस्थ व संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी अँड सचिन देशमुख, अँड.जी .बी .पत्रे, अँड. आर.जे.जोगदंड, अँड.जी.यु.सरोदे , अँड. शेख समीर अँड.भानुदास मगरे,अँड.गणेश देलमडे ,अँड.अभिजित पांडे ,रामराव घुले, मोहिते, सरपंच गिरजाबाई कांबळे, माजी सरपंच निळकंठ,अध्यक्ष नागोराव भांगे पाटील, युनूस नदाफ, सय्यद युनूस आदीसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .मारोती हनुमंतकर यांनी केले तर आभार माधवराव कांजाळकर मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *