नांदेड(प्रतिनिधी)-कंधार तालुक्यातील राऊतखेडा ते तेलूर रस्त्यावर एक जबरी चोरी झाली आहे. बरडशेवाळा ता.हदगाव येथे एक जबरी चोरी झाली आहे. इतवारा, कुंडलवाडी आणि देगलूर येथे तीन दुचाकी गाड्यांची चोरी झाली आहे. या सर्व चोरी प्रकारांमध्ये 1 लाख 77 हजार रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे.
डॉ.केदारनाथ माधवराव देशमुख हे आपली चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.2147 या गाडीने दि.16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नांदेडकडे येत असतांना तेलूर ते राऊतखेडा पुलाजवळ दोन अनोळखी माणसांनी त्यांच्या गाडी पाठीमागे मोटारसायकलवर आले आणि त्यांच्या गाडीवर दगड मारून काचा फोडल्या. सोबतच एकाने लोखंडी रॉडने डॉक्टरासाहेबांच्या कपाळावर मारून दुखापत केली. त्यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे लॉकेट आणि 12 हजार रुपये रोख रक्कम असा 87 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने लुटून नेला. कंधार पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक इंद्राळे अधिक तपास करीत आहेत.
अशोक महादु खोकले हे आपल्या दुचाकी गाडीवर आपल्या नोकरीवर दि.14 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता जात असतांना तीन लोकांनी त्यांची गाडी अडवून त्यांना मारहाण केली. सोबतच कांही इतर लोकांनाही मारहाण केली आणि 10 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. मनाठा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक चव्हाण अधिक तपास करीत आहेत.
शिराढोण ता.कंधार येथून 15 ऑक्टोबर रोजी तीन तासाच्या दरम्यान एम.एच.26 ए.ई.8991 चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 30 हजार रुपये आहे. मुक्ताराम गणपतराव दवणे यांच्या तक्रारीवरुन पोलीसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस अंमलदार राठोड हे करीत आहेत.साईनाथ दाचावार मेडीकल, कुंडलवाडी येथून 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 5 ते 6 यावेळेदरम्यान बालकिशन शिवनाजी फुलारी यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.बी.0722 चोरीला गेली आहे. या गाडीची किंमत 10 हजार रुपये आहे. कुंडलवाडी पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार बेग अधिक तपास करीत आहेत. रफाई कॉलनी देगलूर येथून सय्यद इरफान सय्यद बाहोद्दीन यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 व्ही.एन.3199 ही 40 हजार रुपये किंमतीची गाडी 17 ऑक्टोबर रोजी चोरीला गेली आहे. देगलूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
डॉक्टरला मारहाण करून लुटले; दोन जबरी चोरी आणि तीन मोटारसायकल चोऱ्या