नांदेड(प्रतिनिधी)-स्थानिक गुन्हा शाखेेच्या पोलीस पथकाने भोकर अपर पोलीस अधिक्षक कार्यालयाच्या हद्दीत एका वाहनासह 15 लाख 80 हजार रुपये किंमतीचा गुटखा पकडला आहे.
हिमायतनगर गावात चौपाटी परिसर प्रसिध्द आहे. या चौपाटी परिसरात गुटखा व अन्य तंबाखू जन्य पदार्थांची विक्री होत असते. कांही दिवसांपुर्वी तंबाखू नियंत्रण पथकाने भोकर शहरात कार्यवाही करून कांही तंबाखू जन्य पदार्थ विकणाऱ्या लोकांकडून 30 हजार रुपयांचा दंड वसुल केला होता. त्यानंतर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांना मिळालेल्या माहितीनुसार हिमायतनगर येथे एका वाहनात गुटखा येणार होता. या गाडीचा नंबर स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी आपल्या सोबत काम करणारे पोलीस उपनिरिक्षक डॉ.परमेश्र्वर चव्हाण यांना दिला. पोलीस अंमलदार विश्र्वनाथ इंगळे, शंकर मैसनवाड, केंद्रे, घुगे यांना सोबत घेवून परमेश्र्वर चव्हाण यांनी हिमायतनगर गाठले. त्या ठिकाणी पोलीसांनी आपले पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी दिलेला वाहन क्रमांक एम.एच.26 बी.ई.5785 या गाडीला थांबवून तपासणी केली. त्यामध्ये 10 लाख 80 हजारांचा गुटखा होता. ही गाडी तेलंगणा राज्यातून सौैनामार्गे हिमायतनगरला आली होती. या गाडीचा चालक शेख गफार शेख बाबू रा.रहिम कॉलनी हा होता.
परमेश्र्वर चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शेख गफार शेख बाबू विरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 188, 272, 273, 328 सह अन्य सुरक्षा कायद्याची अनेक कलमे जोडून गुन्हा क्रमांक 248/2021 दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्याकडे देण्यात आला आहे.
खबरी शोधण्यासाठी धडपड
स्थानिक गुन्हा शाखेने ही गुटख्याची कार्यवाही केली ती भोकर अपर पोलीस अधिक्षक यांच्या कार्यक्षेत्रात कायदेशीर प्रक्रियेत बऱ्याच कागदपत्रांना लिहिले जाते, त्याची उत्तरे विचारली जातात. त्यानंतर पुढे त्यावर विचार होतो. हा कायद्याच्या प्रक्रियेतला भाग आहे. पण भोकर डीव्हीजनमध्ये नोकरी नसतांना त्या ठिकाणी कार्यरत झालेले कांही पोलीस आता आपल्या साहेबांना खुश करण्यासाठी स्थानिक गुन्हा शाखेला गुटख्याची खबर कोणी दिली हे शोधणार असे चित्र आहे. त्यानंतर त्या खबर देणाऱ्याला कांही प्रमाणात सेवा देवून तु खबर आम्हाला का दिली नाहीस असे सांगितले जाणार. स्थानिक गुन्हे शाखा थेट पोलीस अधिक्षकांच्या आदेशात काम करणारी यंत्रणा आहे. त्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न म्हणजे पुन्हा एकदा पोलीस अधिक्षकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न नव्हे काय?
अपर पोलीस अधिक्षक कार्यालय भोकरच्या हद्दीत स्थागुशाने लाखो रुपयांचा गुटखा पकडला