नांदेड,(प्रतिनिधी) – आज मंगळवारी ७२९ तपासणीत फक्त एकच नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडला आहे. आज उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५ आहे.कोरोना बाधेतून मुक्त होण्याची टक्केवारी ९७.०४ अशी आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ,नीलकंठ भोसीकर यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आलेल्या माहितीनुसार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी कोरोना बाधेने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.आज एक नवीन रुग्ण सापडलला आहे.
मनपा गृह विलगीकरणातून -०४ आणि सरकारी रुग्णालय विष्णुपुरी येथून ०१ रुग्णाला उपचारा नंतर सुट्टी देण्यात आली आहे.त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ८७६९० झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७.०४ टक्के आहे.
आज ७२९ अहवालांमध्ये ७२८ निगेटिव्ह आणि ०१ पॉसिटीव्ह आहेत.त्यामुळे एकूण रुग्ण संख्या ९०३६३ झाली आहे.आरटीपीसीआर तपासणीत ०१ आणि अँटीजेन तपासणीत ०० असे एकूण ०१ रुग्ण नवीन सापडले आहेत. आज स्वॅब तपासणी ०० अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ०० आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ०० आहेत. आज सापडलेले नवीन रुग्ण मनपा-०१, आहे.
आज कोरोनाचे २१ ऍक्टीव्ह रुग्ण ज्यांच्यावर नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगिकरण -१७ ,सरकारी रुग्णालय
विष्णुपुरी-०३ ,किनवट-०१,असे उपचार सुरू आहेत यात अती गंभीर स्वरुपात ०३ रुग्ण आहेत.
मंगळवारी सलग दोन दिवसांनंतर आनंदाची वाटणी सापडला एकच नवीन रुग्ण