नांदेड(प्रतिनिधी)-लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव हे गाव आपसातील भांडणामुळे अनेक दशकांपासून प्रसिध्द आहे. आज पुन्हा एकदा या गावात दोन गटांमध्ये हाणामारी झाली आहे. त्यातील तीन जण रुग्णालयात उपचार घेत आहेत.
लोहा तालुक्यातील शेवडी बाजीराव हे गाव गावातील आपसात होणाऱ्या भांडणांसाठी प्रसिध्दच आहे. आज पुन्हा एकदा या गावात दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक डॉ.सिध्देश्र्वर भोरे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा ताफा शेवडी बाजीराव गावात पोहचला आहे.
आज झालेल्या भांडणांमध्ये तीन जण जखमी आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. त्यामुळे वृत्तलिहिपर्यंत मारहाणी संदर्भाने कोणतीही माहिती सविस्तरपणे उपलब्ध झाली नाही. पोलीस ठाणे सोनखेड येथे सुध्दा याबाबत कांही एक तक्रार आली नाही.
शेवडी बाजीराव हे गाव पुन्हा एकदा हाणामारीमुळे चर्चेत आले