नांदेड(प्रतिनिधी)-हिंगोली गेट उड्डाणपुलावरून खाली उतरणाऱ्या एका महिलेचे तीन तोळे सोन्याचे गंठण दुचाकीवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी तोडून नेले आहे. याबाबत सध्या कोणत्याही गुन्ह्याची नोंद झालेली नाही. महिलेवर उपचार सुरू आहे.
आज सकाळी 7 वाजेच्यासुमारास एक महिला आपल्या मुलीला शिकवणी क्लासमध्ये सोडण्यासाठी दुचाकीवर जात असतांना हिंगोली गेट उड्डाणपुलावरून अण्णाभाऊ साठे चौकाकडे जात असतांना त्यांच्या पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोन दरोडेखोरांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे गंठण तोडून पळ काढला. या घाई गडबडीत महिला खालीपडली त्यांना कांही जखमा झाल्या आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
घटनास्थळावरील लोकांनी सांगितल्याप्रमाणे हे चोरटे महिलेचे गंठण तोडून अण्णाभाऊ साठे चौकाकडे उतरले आणि उजवीकडे गाडी वळवून पुन्हा हिंगोली गेट उड्डाणपुलाच्या खालून गेले आहेत. पोलीसांकडे माहिती घेतली असता वृत्तलिहिपर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता. पोलीसांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. कोठे-कोठे सीसीटीव्ही उपलब्ध आहेत. याची तपासणी सुरू आहे. त्याचा अभ्यास करून पुढील कार्यवाही होणार आहे.
हिंगोली गेट उड्डाणपुलावर महिलेचे सोन्याचे गंठण तोडले