नांदेड(प्रतिनिधी)-तीन अनोळखी चोरट्यांनी दुचाकीवर एका महिलेच्या गळ्यातील 17 ग्रॅम वजनाचे फक्त 20 हजार किंमतीचे सोन्याचे गंठण तोडून नेले आहे. तामसा गावात एका खाजगी कंपनीच्या बॅटऱ्या चोरीला गेल्या आहेत. तसेच चार दुचाकी चोऱ्यांची नोंद पोलीस दप्तरी झाली आहे. या सर्व चोरीचा ऐवज 1 लाखांपेक्षा जास्त आहे.
सारीका रविंद्र केंद्र या महिला आपल्या मैत्रीणीसोबत नरसींह चौक सम्राट धाब्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर 18 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजेच्यासुमारा मॉर्निंग वॉक करीत असतांना त्यांच्या पाठीमागून मोटारसायकलवर तीन चोरटे आले आणि त्यांनी सारिका केंद्रे यांच्या गळ्यातील 17 गॅ्रम वजनाचे सोन्याचे गंठण बळजबीरने तोडून नेले आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक भिसे अधिक तपास करीत आहेत.
तुकाराम विश्र्वनाथ भालेराव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार शिवपुरी ते भोकर रस्त्यावर त्यांच्या कंपनीच्या एका वाहनाचे बॅटरी बॉक्स तोडून त्यातील 30 हजार रुपये किंमतीच्या दोन बॅटऱ्या चोरून नेल्या आहेत. तामसा पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सुनिल सुर्यवंशी अधिक तपास करीत आहेत.
भोकर शहरातून 60 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी चोरीला गेली आहे. वजिराबाद भागातून 20 हजार रुपये किंमतीची आणि 30 हजार रुपये किंमतीची अशा दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चोरीला गेलेला एकूण ऐवज 1 लाखापेक्षा जास्त आहे.
17 ग्रॅम सोन्याची किंमत 20 हजार रुपये ; चोरीच्या घटनांमध्ये लाखापेक्षा जास्तचा ऐवज लंपास