नांदेड शहरात भुकंप झाला आहे पण तो नुकसानदायक नाही

आता या भुकंपाचे संशोधन होण्याची गरज
नांदेड(प्रतिनिधी)-आज रात्री 12.28 मिनिटाला लेबर कॉलनी भागात भुगर्भातून झालेल्या आवाजाबाबत त्याची नोंद 0.6 रिक्टर स्केल अशी नोंदविण्यात आली आहे. या आवाजाचा केंद्रबिंदू सायन्स महाविद्यालयाच्या आसपास आहे.
रात्री 12.28 मिनिटाला लेबर कॉलनीमध्ये भुगर्भातील आवाजामुळे अनेक लोकांची झोप मोड झाली. कांही वर्षांपुर्वी, सन 2007 च्या आसपास सुध्दा असे अनेक आवाज नांदेड शहरातील अनेक भागात ऐकायला आले होते. त्यावेळी कांही अधिकाऱ्यांनी आपल्यासाठी भुकंप निरोधक इमारती बनवल्या होत्या. कांही अधिकारी विष्णुपूरीच्या स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातील विश्रामगृहात राहायला गेले होते. पण नंतर आवाजाचा विषय बंद झाला होता.
आता 14 वर्षानंतर पुन्हा एकदा या आवाजाची सुरूवात आज झाली. रात्री 12.28 वाजता आलेल्या या आवाजामुळे लेबर कॉलनी व आसपासच्या भागातील लोकांनी रात्र घराबाहेर काढली. या संदर्भाने दिवस उजाडल्यावर माहिती घेतली असता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भुकंप नोंदणी विभागातून मिळालेल्या माहितीनुसार रात्री आलेला आवाज हा भुकंपाचाच प्रकार होता. पण त्याची नोंद 0.6 रिक्टर स्केल अशी झाली आहे.त्यामुळे आजतरी धोक्याचा काही विषय नाही. सोबतच या आवाजाचा केंद्र बिंदु सायन्स महाविद्यालयाच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले.
नांदेड जिल्हा हा ज्वालामुखीमुळे तयार होणाऱ्या खडकांवर आधारलेला आहे. त्याला आज लाखो वर्ष झाली आहेत. जमीनीखाली असलेल्या वेगवेगळ्या प्लेटमध्ये घर्षण होते तेंव्हा असा आवाज येत असतो. भुकंप झालेला आहे. पण तो नुकसानदायक नाही. यावर आता संशोधन होण्याची नक्कीच गरज आहे. कारण लाखो वर्षापुर्वी नांदेड जिल्ह्याची जमीन ज्वालामुखीनंतर उकळणाऱ्या लाव्ह्याच्या खडकावर तयार झालेली आहे. पण आता लाखो वर्ष झाली आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या जमीनीतील स्तरांमध्ये होणारे बदल आता अभ्यास करून त्याबाबत अहवाल तयार करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *