नांदेड(प्रतिनिधी)-रात्री भुकंपाचा धक्का नांदेडकरांनी अनुभवला. पुन्हा दुपारी सुध्दा भुकंपाचा धक्का आल्याची चर्चा व्हॉटसऍप संकेतस्थळावर सुरु झाली आहे. पण या घटनेला कोणीही दुजोरा दिला नाही.
मध्यरात्री 12.28 वाजता भुकंपाचा धक्का नांदेड शहरातील लेबर कॉलनी, श्रीनगर या भागांनी अनुभवला. यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भुकंप मापक यंत्रणेशी संपर्क साधला असता. त्यांनी सांगितले की, एक हेक्टर स्केलपेक्षा कमी असलेल्या भुकंपाचा धक्का नोंदणी प्रक्रियेत सुध्दा योग्यरितीने नोंद होत नाही. रात्री 12.28 ला झालेला भुकंपाचा धक्का हा 0.6 ऐवढा रेक्टर स्केलवर नोंदवला गेला. त्यामुळे 22 ऑक्टोबर रोजी दुपारी झालेला भुकंपाचा धक्का सुध्दा तशाच कांही अवस्थेतला असेल ज्याची नोंद भुकंप मापक यंत्रावर झाली नव्हती. पण आवाज आला अशी चर्चा आयटीआय, लेबर कॉलनी, औद्योगिक वसाहत आदी भागांमधून ऐकायला मिळत होती.
वास्तव न्युज लाईव्हच्यावतीने जनतेला आवाहन करण्यात येते की, कोणत्याही अशा प्रकारचा आवाज भुगर्भातून आला तर त्यातून भिती न बाळगता भुकंप परिस्थितीत काय करावे त्या मार्गदर्शक सुचना लक्षात घेवून जनतेने स्वत:चे रक्षण करावे. प्रशासनाच्यावतीने अशा भुकंपाच्या आवाजाची सुध्दा तपासणी होत असते तेंव्हा प्रशासनाच्या कार्यालयांसोबत संपर्क साधून त्याची माहिती घ्यावी. नुसत्या अफवा पसरवू नका. कारण अफवांमुळे चांगले कधीच घडत नसते त्यातून नुकसानच होत असते.
16 तासात पुन्हा जाणवला भुकंपाचा धक्का?; दक्षता घ्या पण अफवा पसरवू नका