नांदेड(प्रतिनिधी)-दोन अल्पवीयन बालकांकडून वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने 1 लाख 80 हजार रुपये किंमतीच्या 5 दुचाकी गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्या वजिराबाद, उस्माननगर, मुदखेड आणि नांदेड ग्रामीण येथून दोन अशा गाड्या चोरीला गेल्या होत्या.
वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरिक्षक एस.डी.निलपत्रेवार, पोलीस उपनिरिक्षक उत्तम वरपडे पाटील, पोलीस अंमलदार दत्ताराम जाधव, विजय नंदे, गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, शेख इमरान, व्यंकट गंगुलवाड, बालाजी कदम आदींनी दररोजची गस्त करत असतांना 21 सप्टेंबर रोजी पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांनी दिलेल्या माहितीवरुन चिखलवाडी कॉर्नर येथे दोन अल्पवयीन, विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे विचारपुस केली असतांना त्यांनी पाच दुचाकी गाड्या चोरल्याची माहिती दिली. याबाबत वजिराबाद पोलीस ठाणे, उस्माननगर पोलीस ठाणे, मुदखेड पोलीस ठाणे आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे येथे एकूण 5 गुन्हे दाखल आहेत. या जप्त केलेल्या पाच दुचाकी गाड्यांची किंमत 1 लाख 80 हजार रुपये आहे. वजिराबादचे पोलीस अंमलदार व्ही.डी.उत्तकर अधिक तपास करीत आहेत.
वजिराबाद गुन्हे शोध पथकाने दोन अल्पवयीन बालकांकडून पाच चोरीच्या दुचाकी जप्त केल्या