नांदेड(प्रतिनिधी)- धर्माबाद शिक्षण संस्थेच्या लालबहादूर शास्त्री महाविद्यालयात अनुकंपा धर्तीवर मागासवर्गीय कर्मचारी प्रयोग शाळा परिचरास 8 महिन्यापासून वेतन दिले नाही यासाठी उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्यायमुर्ती आर.एन.लड्डा यांनी संस्थेला नोटीस बजावली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी सोमवार 25 ऑक्टोबर रोजी निश्चित आहे. धर्माबाद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पालकमंत्री अशोक चव्हाण हे आहेत.
धर्माबाद शिक्षण संस्थेच्या लालबहादुर शास्त्री महाविद्यालयात संजय नारायण गुर्जलवार हे प्रयोगशाळा परिचर या पदावर कार्यरत आहेत. या संस्थेत मागील 2 वर्षापासून अनागोंधी कारभाराने कळस गाठला. या संस्थेचे सचिव डॉ.काकाणी यांच्या आशिर्वादाने अधिकार नसलेल्या उप प्राचार्याने कर्मचाऱ्यांना मानसिक छळ सुरू केला आहे. जानेवारी 2021 पासून संजय गुर्जलवार यांचा पगार दिला नाही आणि अनुकंपा नोकरीतून काढून टाकण्याची धमकी सुध्दा दिली.
या विरोधात संजय गुर्जलवार यांनी रिट याचिका क्रमांक 9560/2021 दाखल केली. त्यात महाराष्ट्र शासन, धर्माबाद शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.काकाणी आणि संस्थेचे प्राचार्य यांना नोटीस देण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 ऑक्टोबर होणार आहे. संस्थेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभारास संस्थेचे अध्यक्ष अशोक चव्हाण व सचिव डॉ. काकाणी जबाबदार असल्याचे स्थानिक व्यवस्थापन सदस्य डॉ.एस.एस.जाधव यांनी म्हटले आहे.
लालबहादुर शास्त्री महाविद्यालयाला उच्च न्यायालयाची नोटीस