नांदेड(प्रतिनिधी)-दोन चोरट्यांना पकडून स्थानिक गुन्हा शाखेने त्यांच्याकडून 12 दुचाकी गाड्या किंमत 6 लाख 80 हजार रुपयांच्या जप्त केल्या आहेत. यातील कांही दुचाकी गाड्या चोरीचे गुन्हे नांदेड जिल्ह्यात दाखल आहेत.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांच्या सोबत काम करणारे सहकारी पोलीस अधिकारी पांडूरंग भारती, पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय काळे यांनी सिध्दार्थ ग्यानोजी भोकरे (30) रा.मिलिंदनगर वाजेगाव आणि भगवान दिगंबर भद्रे (25) रा.वाजेगाव या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी नांदेड व हिंगोली जिल्ह्यातून 12 दुचाकी गाड्या चोरल्याचे सांगितले. या दुचाकी गाड्यांची किंमत 6 लाख 80 हजार रुपये आहे. नांदेड ग्रामीण, भोकर आणि उस्माननगर येथे यापैकी कांही दुचाकी गाडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोन चोरट्यांना नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे यांनी पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर, पांडूरंंग भारती, दत्तात्रय काळे, पोलीस अंमलदार जसवंतसिंघ शाहु, मारोती तेलंगे, संजय केंद्रे, गंगाधर कदम, रुपेश दासरवाउ, तानाजी येळगे, मोतीराम पवार, विलास कदम, गणेश धुमाळ, गजानन बैनवाड, रणधिर राजबंशी, शेख कलीम यांचे कौतुक केले आहे.
स्थानिक गुन्हा शाखेने 6 लाख 80 हजारांच्या 12 दुचाकी गाड्या पकडल्या