नांदेड(प्रतिनिधी)-हळदीच्या पिकाचे 24 पोते 67 हजार रुपये किंमतीचे शेताच्या आखाड्यावरून चोरी गेल्याचा प्रकार घडला आहे.
दत्ता गोविंद टिपरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 22 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7 ते 23 ऑक्टोबरच्या पहाटे 9 वाजेदरम्यान मौजे बारड शिवारातील त्यांच्या शेताच्या आखाड्यावर तीन पत्राच्या चॅनलगेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी 24 हळदीचे पोते, 67 हजार रुपये किंमतीचे चोरून नेले आहेत. बारड या पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार चक्रधर अधिक तपास करीत आहेत.
हळदीचे 24 पोते चोरले