नविन नांदेड(प्रतिनिधी)-स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने 23 ऑक्टोंबर 2021 रोजी रत्नेश्वरी माता मंदिर परिसरात नवरात्री महोत्सवातील निर्माल्य संकलन करून रत्नेश्वरी माता मंदिराचा परिसर स्वच्छ करण्यात आला ,आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वच्छ भारत अभियान रत्नेश्वरी देवी मंदिर मौजे वडेपुरी तालुका जिल्हा नांदेड येथे आयोजित केलेल्या अभियानात जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे वीस रासेयो स्वयंसेवकांनी सक्रिय सहभाग नोंदविला व परिसर स्वच्छ करण्यात आला, या विद्यार्थ्यांनी दिलेल्या सहभागाबद्दल संस्थेचे अध्यक्ष कर्मयोगी डॉ. नानासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले .सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डब्ल्यू.आर.मुजावर यांचे मार्गदर्शन मिळाले स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रतीक कल्याणकर, विश्वंभर रामटेके ,हनुमान ढगे, नितेश कंधारे ,गणेश सोनटक्के ,जनार्दन मैठे ,अनिकेत गजभारे ,ज्ञानोबा भद्रे ,राहुल जाधव सुबोध धतुरे ,अमोल गंगातीरे, वैभव वाघमारे ,सुदाम गायकवाड, स्वप्नील पाटील आदींनी परिश्रम घेतले.
जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालयाचे रासेयो विद्यार्थ्यांचा स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग