नांदेड (प्रतिनिधी)-मालेगाव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत अनेक महिन्यांपासून पीक कर्जाची प्रकरणे प्रलंबित असल्याने शेतकरी त्रस्त झाले होते शिवसेनेच्या वतीने निवेदन देऊन नियमित शाखा अधिकार्याची नेमणूक करावी व तत्काळ प्रलंबित पीक कर्जाची प्रकरणे निकाली काढावेत अन्यथा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी शिवसेनेच्यावतीने बँक व्यवस्थापनास दिले आहे .
मालेगाव येथील शाखाधिकारी यांची बदली झाल्यानंतर पीक कर्जाचे कामे प्रलंबित झाले हाेते.शाखाधिकारी यांच्या सांगण्यावरून अगोदर खाते नील करा तुम्हाला तात्काळ पुन्हा कर्ज देऊ या आश्वासनानंतर अनेक शेतकर्यांनी सावकाराकडून उसने व्याजाने पैसे घेऊन आपापली खाती जुने-नवे केली.परंतु त्यानंतर मात्र शेतकर्यांना बँकेचे हेलपाटेच मारावे लागले ,शाखाधिकारी नाहीत शेती कर्जाची फाइल तयार करणारे अधिकारी सुट्टीवर आहेत अशी वेगवेगळी कारणे सांगून शेतकर्यांना बँकेच्या चकरा माराव्या लागत होत्या. शेतकऱ्यांची ही अडचण लक्षात घेऊन शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळाने शाखाधिकारी विजय गुप्ता यांना घेराव घालून निवेदन दिले व एक नोव्हेंबरपासून शेतकऱ्यांची पिककर्जाचे वाटप न झाल्यास बँकेत बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला. निवेदनावर शिवसेना शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले ज्येष्ठ शिवसैनिक सुदामराव चौरे प्रकाश इंगोले पवन इंगोले रुखमाजी इंगोले,प्रदीप इंगोले सुदाम पांचाळ,राजकुमार स्वामी , संदीप डाकूलगे , बालाजी सावंत , शिवाजी इंगोले,रामेश्वर इंगोले , साई इंगोले,रामेश्वर इंगोले , तुकाराम इंगोले, गणेश इंगोले यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत .