नांदेड,(प्रतिनिधी)- २१ वर्षीय युवतीचा गळा कापून खून करणाऱ्या २६ वर्षीय युवकाला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी २८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.
भारती संजयसिंह गौर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची मुलगी वैष्णवी वय २१ हिने त्यांना २४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२.३० वाजता करून सांगितले की,सुरेश उर्फ मिनो देविदास शेंडगे हा आपल्या घरी आला आहे.तो मला सांगत होता की, तू मला का नाही बोल्ट आहेस.तुझे इतर मुलांसोबत अफेअर आहे.असे सांगत त्याने मला चाकूने अनेकदा मारले आहे.आता सर्व संपले आहे.असे शब्द ऐकताच आई भारती गॅरी आल्या तेव्हा वैष्णवीचा गळा चाकूने चिरलेला होता.तिचे प्राण संपलेले होते. लगेच भारतीने पोलीस ठाणे विमानतळ गाठले.पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी त्वरितच सुरेश शँडगेला ताब्यात घेतले.
या प्रकरणांची माहिती अशी की, भारती आणि संजयसिंह यांची मुलगी वैष्णवी ही विधी विषयाची विद्यार्थिनी आहे.शिक्षण घेत घेत हि वैष्णवी बँगल्स अँड जनरल स्टोअर्स चालवते.त्यांची दुकान अगोदर तानाजी नगर भागात होती.ती बदलण्यासाठी प्रयत्न सुरु असतांना आनंदनगर भागातील स्वामी समर्थ मोबाईल शॉपी हि दुकान रिकामी होणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सुरेश शेंडगे सोबत चर्चा झाली.ती दुकान मिळवून देणे आणि त्याची सुरुवात करण्यासाठी सुरेशने मदत केली. त्यामुळे ओळख वाढली.पण त्यातून जगातील सर्व संपत्ती आपलीच असते असा समाज सुरेश शेंडगेचा झाला.त्याच्यामुळे वैष्णवी माझीच आहे असा समज करून घेणाऱ्या सुरेशने वैष्णवी सोबत लग्न करण्याची तयारी दाखवली.पण शिक्षण कमी असल्याने भारती यांनी नकार दिला.तेथून खटके सुरु झाले,परिणाम २४ ऑक्टोबर रोजी भयंकर घडला.
शारदा नगर भागातील ऍड.हळदणकर यांच्या घरात गौर कुटुंबीय किरायाने राहत होते. तेथे आला सुरेश आणि वैष्णवीला म्हणाला ‘तुम मुझको न चाहो तो कोई बात नही किसी और को चाहो तो मुश्किल होगी’.सुरेशने चाकूच्या साहयाने वैष्णवीचा गळा चिरला आणि तिचा खून केला.
भारती गौरीच्या तक्रारीनुसार विमानतळ पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३२५/२०२१ भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ४/२५ नुसार दाखल केला.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक एन.आर.आनलदास यांच्याकडे देण्यात आला.
काल दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सहायक पोलीस निरीक्षक एन.आर.आनलदास आणि पोलीस अंमलदार गायकवाड, भिसे,रामदास सूर्यवंशी यांनी वैष्णवीचा खून करणारा सुरेश शेंडगे यास न्यायालयात हजर केले.सरकारी वकील ऍड.मोहमंद राजियोद्दीन यांनी पोलीस कोठडी देण्यासाठी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्या.एन.एल.गायकवाड यांनी सुरेश शेंडगेला २८ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत पाठवले आहे.