विधानसभा निवडणुकीतील विशेष पथकाने पाच लाखांचा गांजा पकडला

एक महिला आणि दोन पुरूषांना दोन दिवस पोलीस कोठडी
नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत लावलेल्या विविध पथकातील एका पथकाने एका कारमध्ये 57 किलो 567 ग्रॅँम गांजा पकडला आहे. या गांजाची किंमत 5 लाख 18 हजार रुपये आहे. कुंडलवाडी पोलीसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक केल्यानंतर बिलोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीराजेश पत्की यांनी दोन पुरुष आणीन एक महिला आरोपींना दोन दिवस अर्थात २९ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
देगलूर-बिलोली मतदार संघात सध्या पोटनिवडणुक सुरू आहे. त्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यातील एका पथकाने 26 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजता चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.06 ए.झेड.5385ची तपासणी केली असता त्यात 57 किलो 567 ग्रॅंम गांजाचे दोन बॉक्स सापडले. या गाजांची किंमत 5 लाख 18 हजार रुपये आहे. सोबतच चार चाकी गाडी 3 लाख रुपये किंमतीची आणि दोन मोबाईल 16 हजार रुपयांचे असा 8 लाख 34 हजार 103 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. बिलोली पंचायत समितीतील ग्रामविकास अधिकारी दत्ता लक्ष्मण वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कुंडलवाडी पोलीसांनी अंमलीपदार्थ प्रतिबंधीत कायदा 20(ब) (सी), 22 प्रमाणे गुन्हा क्रमांक 134/2021 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास कुंडलवाडीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक करीम खान पठाण यांच्याकडे देण्यात आला आहे.
                      पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे,देगलूरचे पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे,धर्माबादचे पोलीस उप अधीक्षक विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण,पोलीस उप निरीक्षक विशाल सूर्यवंशी,पोलीस अंमलदार आडे,माकूरवार, चौहान, च्यापलवार आणि कमलाकर यांनी पूर्ण केली.
या प्रकरणात गांजाची अवैध आणि चोरटी वाहतूक करणाऱ्या फेरोज अब्दुल पठाण रा.सोनेरीगल्ली परतूर, सय्यद गौस सय्यद सिद्दीकी रा.हैद्राबाद आणि एक महिला अशा तीन जणांना  कुंडलवाडी पोलीसांनी अटक केली. आज दि.27 ऑक्टोबर रोजी कुंडलवाडी पोलीसांनी पकडलेल्या लोकांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राजेश पत्की यांच्या समोर हजर करून तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायाधीश पत्की यांनी गांजाची वाहतुक करणारे दोन पुरूष आणि एक महिला यांना दोन- दिवस पोलीस कोठडीत पाठवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *