नांदेड(प्रतिनिधी)-घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या शमा गॅस एजन्सीच्या डिलेव्हरी पर्सन करणाऱ्या कांही मंडळींना जास्तीची रक्कम ग्राहकांकडून उकळण्याची सवय लागली आहे. एका सिलेंडर मागे 55 रुपये जास्त मागणी केल्याचा प्रकार घडला आहे.
घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा करण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्यासाठी अगोदर काही अनुदानपण होते पण आता अनुदान जवळपास बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आज घरगुती गॅसचा दर 915 ते 925 रुपये आहे. या 915 ते 925 रुपयांमध्ये गॅस ग्राहकांना ते गॅस सिलेंडर घरी पोहचती करण्याची सेवा सुध्दा समाविष्ट आहे. आज याबाबत ऑनलाईन तपासणी केली असता गॅसचा दर 900 रुपये दाखवत आहे. गॅस एजन्सीने ग्राहकांने सिलेंडरचा नंबर लावल्यानंतर त्याची पावती तयार करणे आणि ती पावती आपल्या डिलेव्हरी पर्सनला देवून गॅस सिलेंडर ग्राहकांच्या घरी पाठवणे आणि ग्राहकांकडून पावतीवर असलेली रक्कम घेणे ही डिलेव्हरी पर्सनची जबाबदारी आहे.
काल एका ग्राहकाच्या घरी शमा एजन्सीचा डिलेव्हरी पर्सन आला. त्याने गॅस सिलेंडर आणि पावती आणली होती. या पावतीवर 915 रुपये रक्कम लिहिले असतांना त्याने घरातील महिलांकडून 970 रुपयांची मागणी केली. यावर महिलांनी जाब विचारला असता हे पैसे द्यावेच लागतात असे तो डिलेव्हरी पर्सन म्हणाला. पावती 970 रुपयांची आणली असती तर आम्ही 970 रुपये दिले असते मात्र पावती 915 रुपयांची तर मग 970 रुपये देणार कसे यावरून कुरबुर झाली. कुरबूर झाल्यानंतर सुध्दा त्याने डिलेव्हरी पर्सनने 915 रुपयांची पावती असतांना ग्राहकांकडून 950 रुपये घेतले आहेत.
गॅस वितरणावर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याचे नियंत्रण असते. गॅस कंपनीच्यावतीने सर्व प्रकारच्या कामाच्या गाईडलाईन जारी केलेल्या आहेत. तरीपण शमा गॅस एजन्सीच्या डिलेव्हरी पर्सनने जास्त पैसे घेतल्याबाबतचा निषेध व्यक्त होत आहे. कांही ठिकाणी शमा एजन्सीचे डिलेव्हरी पर्सन चौथ्या मजल्यावर गॅस सिलेंडर पोहचती करतात. पण पावतीवर लिहिलेच पैसे घेतात. काल घडलेला प्रकार हा तळमजल्यावर सिलेंडर देतांनाचा आहे. शमा गॅस एजन्सीमध्ये कांही डिलेव्हरी पर्सन छान आहेत. तर काही ग्राहकांची लुट करण्यासाठीच डिलेव्हरी पर्सनचे काम करत आहेत असे एकूण चित्र आहे.
शमा गॅस एजन्सीचे डिलेव्हरी पर्सन ग्राहकांची लुट करीत आहेत