एस.टी.कर्मचाऱ्यांचे आंदोलन दुसऱ्यादिवशीही सुरू

नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर-बिलोली मतदार संघातील शासकीय सेवेत असलेल्या एस.टी.बसेस वगळता आज दुसऱ्या दिवशी 17 संघटनांनी मिळून तयार केलेल्या कृती समितीने एकही बस नांदेड बसस्थानकाबाहेर जावू दिली नाही. आपल्या वेतनाच्या मागणीसाठी एस.टी.कर्मचाऱ्यांनी पुकारलेला हा बंद प्रवाशांसाठी त्रासदायकच आहे.
17 एस.टी.कर्मचारी संघटनांनी मिळून तयार केलेल्या कृती समितीने एस.टी.चा चक्काजाम आंदोलनाची सुरूवात 27 ऑक्टोबर पासून केली. कांही कर्मचारी विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करीत आहेत. अत्यंत छोट्याशा वेतनावर काम करणारे कर्मचारी दोन-दोन महिने विलंबाने आपले वेतन घेतात. आर्थिक विवंचनेतून एस.टी.कर्मचाऱ्यांमधील अनेकांनी राज्यभरात आपले जीवन संपुष्टात आणले तरी प्रशासन एस.टी.कर्मचाऱ्यांच्या वेतन मागणी संदर्भाने कोणतीही दया आली नाही. आपल्या वेतनात विविध मागण्याकरत दिवाळी बोनस सुध्दा मिळावा अशी मागणी आहे.
आज दुसऱ्या दिवशी देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या कामासाठी आरक्षीत केलेल्या बस गाड्या वगळता इतर सर्व गाड्या बंद आहेत. त्यामुळे प्रवाशांना हा भाग त्रासदायकच आहे. उपोषणाची आणि आंदोलनाची व्याप्ती वाढवायची नसेल तर प्रशासनाने याची दखल लवकर घ्यावी असे आवाहन संयुक्त कृती समितीचे एम.बी.बोर्डे, बी.व्ही. पांचाळ, बी.एन.मोरे, पी.आर.इंगळे, एम.एन.शिंदे, आर.टी.वाघमारे, एस.एल.औंढेकर, जे.एन.कांबळे, एस.बी.सूर्यवंशी, बी.एस.बुध्देवार, आर.बी.धुतमल, सी.डी.कांबळे आदींनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *