नांदेडच्या ताहेरअली खान पठाणचा समावेश
नांदेड(प्रतिनिधी)- सन 2013 मध्ये विभागीय परिक्षा उत्तीर्ण झालेल्या कांही पोलीस अंमलदारांची पदोन्नती रखडली होती. याबाबत पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मंजुरी दिल्यानंतर राज्यातील 12 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदी पदोन्नती दिल्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
पोलीस महासंचालक कार्यालयातील आस्थापना शाखेचा अतिरिक्त कार्यभार असलेले विशेष पोलीस महानिरिक्षक संजीवकुमार सिंघल यांनी स्वाक्षरी करून जारी केलेल्या आदेशात राज्यातील 12 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. त्यात नांदेड जिल्ह्यातील एका पोलीस अंमलदाराचा समावेश आहे.
पदोन्नती देण्यात आलेले पोलीस अंमलदार पुढील प्रमाणे आहेत. ताहेर अल्ली जब्बार अल्ली पठाण- नांदेड, प्रकाश विठ्ठल सुर्ये-रत्नागिरी, किशोर नामदेव मोहिते आणि सुनिल रामचंद्र वेदपाठक-मुंबई शहर, प्रविण भास्कर वाडेकर आणि अरुण आनंदा जाधव-लोहमार्ग मुंबई, अभय अविनाश कामत-ठाणे शहर, रविंद्र शांताराम मुन्तोडे आणि विलास रामचंद्र पाटील-नाशिक शहर, नंदकिशोर गिरजू काते-अहमदनगर, मनोज प्रभाकरराव कुलकर्णी-बीड, सुभाष परसराम राठोड-अमरावती ग्रामीण असे आहेत.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी पोलीस उपनिरिक्षक पदाची पदोन्नती प्राप्त करणाऱ्या सर्व पोलीस अंमलदारांना शुभकामना देवून भविष्यात पोलीस दलाचे नाव उज्वल करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
राज्यात 12 पोलीस अंमलदारांना पोलीस उपनिरिक्षक पदोन्नती