नांदेड(प्रतिनिधी)-भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या एका 60 वर्षीय ज्येष्ठ नागरीकाचा खून करण्यात आला आहे या प्रकरणी हिमायतनगर पोलीसांनी एका युवकाला अटक केली आहे.
सविता संतोष गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 ऑक्टोबर रोजी रात्री 9 ते 9.30 वाजेदरम्यान मौजे मंगरुळ ता.हिमायतनगर येथे त्यांचे वडील विठ्ठल मसाजी गोरेकर (60) हे किरण महादु गोपने (25) आणि शांताबाई महादु गोपने (60) रा.मंगरुळपिर ता.हिमायतनगर येथे गेले. झालेल्या भांडणात तोडगा काढण्याचा उद्देश घेवून गेलेल्या विठ्ठल गोरेकर यांना किरण गोपनेने लाकड्याच्या बडग्याने विठ्ठल गोरेकर यांना मारहाण केली. विठ्ठल गोरेकर खाली पडल्यावर त्यांच्या पोटात, छातीवर बडग्याने मारहाण करून त्यांचा खून केला. सोबतच विठ्ठल गोरेकर यांच्या पुत्राला सुध्दा मारहाण करण्यात आली.
हिमायतनगर पोलीसांनी याप्रकरणी गुन्हा क्रमांक 254/2021 भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 307, 324, 109, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरिक्षक कांबळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक बी.जी.महाजन अधिक तपास करीत आहेत. या प्रकरणात हिमायतनगर पोलीसांनी किरण महादु गोपने यास अटक केली आहे.
60 वर्षीय ज्येष्ठ व्यक्तीचा खून करणारा युवक गजाआड