गुरुद्वारा बोर्डाचे सदस्य गुरमितसिंघ उर्फ राजे महाजन यांचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळला

नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा बोर्डाचे निर्वाचित सदस्य आणि दोषारोपपत्रात फरार आरोपी या सदरात नाव असलेल्या गुरमितसिंघ उर्फ राजे यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.एन.गौतम यांनी अटकपुर्व जामीन नाकारला आहे.
29 मार्च 2021 रोजी घडलेल्या पोलीस हल्ला प्रकरणात दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक 114 मध्ये पोलीसांनी जवळपास 25 पेक्षा जास्त आरोपींना अटक केली. या गुन्ह्याची तक्रार सहायक पोलीस निरिक्षक सोमनाथ शिंदे यांनी दिली होती. पोलीसांवर कट रचून हल्ला करून यासह साथ रोग प्रतिबंधक कायद्या, भारतीय हत्यार कायदा, भारतीय दंड संहितेची अनेक कलमे आपत्ती व्यवस्थापन कायदा, पोलीस कायदा अशा अनेक कलमांची या गुन्ह्यात जोडणी करण्यात आली होती. या प्रकरणात अनेक जणांविरुध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहेत.या गुन्ह्याचा तपास वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांच्याकडे आहे. याच दोषारोपपत्रात गुरमितसिंघ उर्फ राजे हरमितसिंघ उर्फ लड्डूसिंघ महाजन यांचे नाव भारतीय प्रक्रिया संहितेच्या कलम 299 प्रमाणे फरार आरोपी या सदरात लिहिण्यात आलेले आहे. या गुन्हा क्रमांक 114/2021 मध्ये गुरमितसिंघ महाजन यांनी अटकपुर्व जामीन अर्ज मिळावा म्हणून अर्ज केला. त्या अर्जाचा क्रमांक 849/2021 असा आहे.
न्यायालयाच्या अभिलेखात गुरमितसिंघ उर्फ राजे हरमितसिंघ उर्फ लड्डूसिंघ महाजन यांची बाजू ऍड. मनिष खांडील (शर्मा) यांनी मांडल्याचा उल्लेख आहे. आपले सादरीकरण करतांना गुरमितसिंघच्यावतीने ऍड. शर्मा यांनी सांगितले या गुन्ह्यात पकडण्यात आलेल्या लोकांपैकी 18 जणांकडून पोलीस कोठडीमध्ये कोणतीही जप्ती करणयात आलेली नाही. गुरमितसिंघची पोलीस कोठडीतील तपासणी आवश्यक नाही. याविरुध्द सरकारी वकीलांनी कांही फोटो न्यायालयात सादर केले. ज्यामध्ये गुरमितसिंघ महाजन घटनेच्या दिवशी तेथे हजर असल्याचे दिसतात. गुरमितसिंघ महाजन यांच्यावतीने उच्च न्यायालयाचे अनेक न्याय निवाडे सादर करण्यात आले. न्यायालयाने दाखल करण्यात आलेले वरिष्ठ न्यायालयांचे निवाडे या गुन्हा क्रमांक 114 शी जोडले जावू शकत नाही अशी नोंद आपल्या निकालात केली आहे. गुरमितसिंघ महाजनच्यावतीने ऍड. शर्मा यांनी गुरमितसिंघ महाजनच्या हक्कात निकाली निघालेले दोन न्याय निर्णय सादर केले. याबाबत न्यायाधीश गौतम यांनी असे झाले असले तरी गुरमितसिंघ महाजन विरुध्द दोन फौजदारी खटले प्रलंबित आहेत. महाजन हे घटना घडली तेंव्हापासून फरार आहेत. म्हणून त्यांना जामीन देता येणार नाही अशी नोंद निकालात केली आणि गुरमितसिंघ महाजनचा अटकपुर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. या खटल्यात जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.आशिष गोदमगावकर यांनी मांडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *