नांदेड(प्रतिनिधी)-कोल्हारी ता.हदगाव या जंगलात एका 50 वर्षीय व्यक्तीचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी घडली आहे आणि एक चोरी घडली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक दुचाकी गाडी चोरीला गेली आहे.
शेषराव मारोती वाघमारे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे भाऊ पांडूरंग मारोती वाघमारे (50) हे जळतानासाठी लाकडे आणायची म्हणून सोबत कुऱ्हाड घेवून 29 ऑक्टोबर रोजी सकाळी कोल्हारी दरीत जंगल टेकडीवर गेले. 11 वाजेपर्यंत पांडूरंग मारोती वाघमारे यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. त्यांच्या गळ्यावर, छातीवर अज्ञात मारेकऱ्यांनी अज्ञात कारणासाठी वार करून त्यांचा खून केला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा क्रमांक 256/2021 कलम 302 भारतीय दंड संहिताप्रमाणे दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास हिमायतनगरचे पोलीस निरिक्षक भगवान कांबळे हे करीत आहेत.
रामेश्र्वर भगवान आनकोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 28 ऑक्टोबरच्या सायंकाळी 7.30 वाजेच्यासुमारास पावडे वाईन मार्ट येथे तीन अनोळखी माणसांनी त्यांच्या जवळ येवून बळजबरीने त्यांच्या खिशातील 12 हजार रुपये, एक मोबाईल 5 हजार रुपयांचा असा 17 हजारांचा ऐवज बळजबरीने चोरला. तसेच खिशातील एक दुसरा मोबाईल 3 हजार रुपये किंमतीचा बळजबरीने काढला. त्यांना लाभाबुक्यांनी मारहाण केली आणि तो मोबाईल फेकून दिला. शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरिक्षक गायकवाड करीत आहेत.
सिध्दार्थ जळबाजी हटकर हे राजस्थान पोरणमध्ये सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. आपल्या घराचे बांधकाम सुरू असल्याने नारायण पाटीलनगर येथे 28-29 च्या रात्री बांधकामाच्या ठिकाणी झोपले. डोक्याच्या उशीजवळ दस्तीत बांधून ठेवलेले 50 हजार रुपये आणि 3 मोबाईल 30 हजार रुपये किंमतीचे असा 80 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेला आहे. शिवाजीनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
मरीबा मारोती कांबळे, यांची दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.26 ए.एच.3586 ही 10 हजार रुपये किंमतीची गाडी कैलासनगर येथून 9 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 1 वाजता चोरीला गेली भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अंमलदार सातारे अधिक तपास करीत आहेत.
खून, जबरी चोरी, सैनिकाचे पैसे चोरले आणि दुचाकी चोरी