देगलूर-बिलोली विधानसभा निवडणुकीत ६४ टक्केच्या आसपास झाले मतदान;भविष्य मतपेटीत बंद

देगलूर,(प्रतिनिधी)- पोट निवडणुका विरोधी पक्षांना आपला दमखम दाखवण्यासाठी सुवर्णसंधी असते.तसेच सत्ताधारी मंडळींना आपला दम टिकलेला आहे हे दाखवण्यासाठी मेहनत घेणारा वेळ असतो. अश्या पद्धतीत अत्यंत चुरशीची असलेल्या देगलूर-बिलोली विधानसभेच्या पोट निवडणुकीत जवळपास ६४ टक्के मतदान झाले आहे.उमेदवारांचे भविष्य आता मतदान यंत्रात बंद झाले आहे.पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे स्वतः या निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी आपल्या अनेक अधिकाऱ्यांसह तळ ठोकून होते.निवडणूक मतदान शांततेत पार पडले आहे.
               देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली. एकूण बारा उमेदवार रिंगणात आहेत पण खरी लढत  भाजपा, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होत आहे. सकाळ पासून अनेक ठिकाणी मतदारानी रांगा लावल्या होत्या.
    भागातील काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे कोरोनाने निधन झाले. यामुळे येथील पोटनिवडणुक होत आहे. काँग्रेसकडून रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर तर भाजपाकडून सुभाष साबणे व वंचित बहुजन आघाडी कडून उत्तम इंगोले यांच्यासह 12 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.या निवडणूकीत 412 मतदान केंद्रावर मतदान झाले आहे. या मतदार संघात १ लाख ५४ हजर ९२ पुरुष मतदार आहेत आणि  1 लाख 44 हजार 256 स्त्री मतदार व इतर 5 आणि शासकीय अधिकारी व कर्मचारी मतदाराची संख्या 187 असून असे एकूण 2 लाख 98 हजार 540 मतदार आहेत.मतदानाचा वेळ संपला तेव्हा जवळपास ७४ टक्के मतदान झाले होते.
                   या पोट निवडणुकीला जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली प्रतिष्ठा लावलेली आहे.पण विजयी कोण होणार हे निकाल आल्यावरच दिसेल आणि मगच त्याचे विश्लेषण करता येणार आहे. असो. आजची निवडणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे हे देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघात तळ ठोकून होते.त्यांच्या सोबत देगलूरचे पोलीस उप अधीक्षक सचिन सांगळे,धर्माबादचे विक्रांत गायकवाड,बिलोलीचे सहायक पोलीस अधीक्षक अर्चित चांडक,देगलूरचे पोलीस निरीक्षक सोहन माछरे,बिलोलीचे शिवाजी डोईफोडे,मरखेलचे चोरमले,रामतीर्थचे सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, कुंडलवाडीचे करीमखान पठाण,कुंटूरचे माधव पुरी याच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस अमंलदारानी मेहनत घेत या पोट निवडणुकीत आपले कर्तव्य बजावले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *