दुचाकी डिकी तोडून अडीच लाख रुपये चोरले; चोरीच्या एकूण घटनांमध्ये पावणे सहा लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(प्रतिनिधी)-चार वेगवेगळ्या चोऱ्यांमध्ये 4 लाख 73 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास झाला आहे. सोबचत 1 लाख 1 हजार रुपये किंमतीच्या चार दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. त्यात एका दुचाकीतून डिकीचे लॉक तोडून चोरट्यांनी अडीच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
रामतिर्थ येथील आत्महाराम मारोती फुलारी यांनी दिलेल्या दिलेल्या तक्रारीनुसार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 11.50 ते 12 फक्त 10 मिनिटात नरसी येथील गुरूकृपा ईलेक्ट्रीक दुकानासमोर त्यांनी उभी केल्या दुचाकी क्रमांक एम.एच.26 ए.एम.1063 च्या डिक्कीचे लॉक तोडून चोरट्यांनी त्यातील अडीच लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली आहे. रामतिर्थ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरिक्षक विजय जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक शेख अधिक तपास करीत आहेत.
अरुण साहेबराव सुनेगावकर यांचे अर्धापूर येथे फळे व भाजीपाला विक्री संघाचे गोडाऊन 20 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 ते 29 ऑक्टोबरच्या दुपारी 3 वाजेदरम्यान कोणी तरी चोरट्यांनी फोडले. त्यात ठेवलेला बिटी बारदाना 70 हजार 100 रुपयांचा आणि 7200 रुपये किंमतीचे दोन वजन काटे असा एकून 74 हजार 300 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक पवार अधिक तपास करीत आहेत.
मौजे सवना ता.हिमायतनगर येथे साहेबराव मारोती बच्चेवार यांचे आणि इतर लोकांचे घर चोरट्यांनी 30 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12.30 ते 2 वाजेदरम्यान फोडले. या घरातून सोन्या-चांदीचे दागिणे आणि रोख रक्कम असा 1 लाख 29 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला आहे. हिमायतनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला असून पोलीस हवालदार राठोड अधिक तपास करीत आहेत.
मौजे गणपूर कामठा ता.अर्धापूर येथून 22 ऑक्टोबर रोजी एका मोबाईल टावरमधून 20 हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी चोरले आहे. अर्धापूर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. सोबतच हदगाव, मुदखेड, नांदेड ग्रामीण आणि लोहा या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चार दुचाकी गाड्या चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *