नांदेड,(प्रतिनिधी)- शिवाजीनगर पोलिसांनी दोन दिवसात चोरी झालेल्या दोन महागड्या सायकली चोरट्याला पकडून जप्त केल्या आहेत.
२९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजे दरम्यान विजयनगर नितीन वसंतराव बोन्द्रे यांनी आपल्या घराच्या व्हरांड्यात उभी केलेली ६८०० रुपये किमतीची सायकल चोरीला गेली होती. त्याबाबत शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पुढे ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास यशवंत नगर ऋषभ धनराज कोठारी यांची ११५०० रुपये किमतीची सायकल दुपारी ४ वाजेच्या सुमारास चोरीला गेली होती.त्यानंतर मात्र शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक आनंदा नरुटे यांनी सायकल चोरीच्या घटनेला अत्यंत गांभीर्याने घेतले.गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहुळे यांनी आपल्या काही सहकारी पोलीस अमलदारांसह या सायकल चोरीचा तपास काही तासातच उघड केला.
काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटलेल्या चतुर दिलीप ढेम्बरे (२०) यास ताब्यात घेतले.त्यानेच दोन सायकली चोरल्या होत्या.चोरलेल्या सायकली त्याने पोलिसांना दिल्या आहेत.काही तासातच सायकल चोराला पकडणाऱ्या शिवाजीनगर पोलिसांचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे आणि अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांनी कौतुक केले आहे.