नांदेड(प्रतिनिधी)-गुरूद्वारा तख्त सचखंड श्री हजुर साहिब येथे 31 ऑक्टोबर रोजी सन 2021 च्या दिवाळी महोत्सवाची सुरूवात जत्थेदार संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते पहिला दिवा प्रज्वलीत करून झाली.
31 ऑक्टोबर 2021 रोजी दिवाळीची सुरूवात करतांना गुरूद्वारा परिसरात जत्थेदार संत बाबा कुलवंतसिंघजी यांनी दिवाळी महोत्सवाच्या पहिल्या दिव्याला प्रज्वलीत करून महोत्सवाची सुरूवात केली. याप्रसंगी भाई रामसिंघजी धुपिया, गुरूद्वारा बोर्डाचे सचिव सरदार रविंद्रसिंघ बुंगई, गुरूद्वारा बोर्डाचे अधिक्षक गुरविंदरसिंघ वाधवा, सहाय्यक अधिक्षक रविंद्रसिंघ कपुर यांची उपस्थिती होती. गुरूद्वारा परिसरात मेणबत्त्या पेटवून दिवाळी साजरी होत असते. पण यंदा मेणबत्ती न लावता गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने दिले जाणारे दिवे प्रज्वलीत करून आणि त्या दिव्यांमध्ये तेल टाकून तसेच मातीचे दिवे प्रज्वलीत करून दिवाळी साजरी करा असे आवाहन गुरूद्वारा बोर्डाचे सचिव रविंद्रसिंघ बुंगई यांनी केले आहे.
गुरूद्वारा तख्त सचखंड श्री हजुर साहिब येथे दिवाळी महोत्सवाची सुरूवात संतबाबा कुलवंतसिंघजी यांच्या हस्ते संपन्न