इतवारा पोलीस उप विभागातून झाली कानउघाडणी उघाडणी
नांदेड(प्रतिनिधी)-दि.27 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता घडलेला गुन्हा नांदेड ग्रामीण पोलीसांनी 29 ऑक्टोबरच्या दुपारी 1.25 वाजता दाखल केला. या प्रकरणातील विद्यार्थी हा अल्पवयीन आणि अनुसूचित जातीचा आहे. तरी पण या गुन्ह्यात ऍट्रॉसिटी कायद्याचे कलम जोडण्यात आले नाही. यावरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याला ऍट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्याची अलर्जी आहे काय? असा प्रश्न समोर आला आहे.
दि.27 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता सिडको एन.डी.-42 या भागातून सुमित संतोष सरोदे हा 17 वर्षीय युवक जात असतांना मोनुसिंग बलविंदरसिंग बावरी याने इकडे का फिरतोस असे म्हणून सुमित सरोदेला मारहाण केली. या मारहाणीत खंजीरने सुमितच्या डोक्यात तीन ठिकाणी मारून त्यास जखमी करण्यात आले. सुमितीच्या डोक्याला ही जखम दुरूस्त करण्यासाठी 12 टाके लावावे लागले. घटनेची माहिती पोलीसांना दिल्यानंतर सुध्दा नांदेड ग्रामीण पोलीसांनी फिर्यादीने परस्पर सरकारी दवाखाना विष्णुपूरी येथे जावून उपचार करून आज पोलीस ठाण्यात येवून तक्रार दिली असे लिहिले आहे आणि 29 ऑक्टोबरच्या पोलीस डायरीमध्ये क्रमांक 18 वर 13.25 वाजता या गुन्हा क्रमांक 775/2021 ची नोंद आहे. या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे 326, 504, 506 आणि भारतीय हत्यार कायद्याची कलम 4/25 जोडण्यात आलेली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील तक्रारदार अल्पवयीन बालक सुमित संतोष सरोदे हा अनुसूचित जातीचा आहे. तरीपण गुन्हा क्रमांक 775 मध्ये ऍट्रॉसिटी कायदा जोडण्यात आलेला नाही. यावरून पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणला ऍट्रॉसिटी कायद्याच्या संदर्भाने गुन्हे दाखल करण्याची ऍलर्जी आहे की काय? असा प्रश्न समोर आला आहे. दरम्यान पोलीस उपअधिक्षक कार्यालय इतवारा यांच्या माध्यमाने सुध्दा ही चुक करणाऱ्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याची कानउघाडणी झाली आहे अशी खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे.